शिवाली परबच्या पायावर नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा; 'कितीही मॉडर्न...'

Shivali Parab Limocar: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेली शिवाली परब ही आपल्या फोटोंनी सध्या सर्वांनाच घायाळ करताना दिसते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे. परंतु यावेळी तिच्या एका फोटोनं सर्वांनाच घायाळ केलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 19, 2023, 05:34 PM IST
शिवाली परबच्या पायावर नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा; 'कितीही मॉडर्न...'  title=
July 18, 2023 | Maharashtrachi Hasyajastra Shivali Parab travels from limocar in usa tour netizens reacts

Shivali Parab Trolled: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घरोघरी पोहचलेली शिवाली परब हीची सर्वत्र चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. शिवाली ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. त्यामुळे तिचीही अनेकदा चर्चा असते. इन्टाग्रामवरही तिचे असंख्य फॅन्स आहेत. त्यातून तिचे हटके फोटोशूटही अनेकदा चर्चेत असते. आता तिचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या संपुर्ण टीमचा अमेरिका दौरा सुरू आहे. त्यामुळे त्याचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. अशाच शिवालीही आपल्या या अमेरिका दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते आहे. यावेळी तिनं लिमोकारमधून मस्तपैंकी फोटो काढले आहेत. त्यामुळे तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे तिच्या या फोटोंवर चांगल्याच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. 

शिवाली परब ही अनेकदा आपल्या हटके आणि बोल्ड फोटोशूटनं आपल्या चाहत्यांना घायाळ करताना दिसते. आता तिच्या या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच क्रेझ आहे. यावेळी तिनं लिमोकारमध्ये आपले हटके फोटोशूट शेअर केले आहे. यावेळी तिनं हटके कॉश्चुम्स परिधान केले आहेत. तिच्या या फोटोंमुळे सगळेच भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकदा चाहते तिच्या फोटोंवर तिचे चाहते ट्रोलही करताना दिसतात. काहीवेळा शॉर्ट कपड्यांमुळे ती ट्रोलही झाली आहे. मध्यंतरी शॉर्ट ड्रेस घातल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी टोमणे मारून मारून हैराण केले होते. आताही तिच्या या फोटोंंवर तिच्या चाहत्यांनी अनेक सकारात्मक कमेंट्स केल्या असल्या तरीसुद्धा अनेक टोमणेही नेटकऱ्यांनी मारले आहेत. 

हेही वाचा - विवेक अग्निहोत्री पुन्हा सज्ज! 'द काश्मीर फाईल्स'चा पुढील अध्याय लवकरच तुमच्या भेटीला

''आजपर्यंत बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या चित्रपटात पाहिलेल्या लिमो ह्या कारमधे आज बसले आणि Washington DC या शहरात फिरले. कमालीचा अनुभव होता.'' असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं असून ज्यांच्यामुळे तिला हा अनुभव घेतला आला त्यांचे तिनं आभारही मानले आहेत. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा कॉश्चुम परिधान केला होता. तिनं पांढऱ्या रंगाची मिडी घातली होती आणि सोबतच तिनं हाय हिल्स घातले होते. यावेळी तिच्या पायातल्या पैंजणांनी तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्यातून तिनं या लिमोकारमध्ये पहिल्यांदाच बसून त्या कारच्या हात हटके पोझही दिली होती. त्यामुळे तिची विशेष चर्चा रंगली होती. एका युझरनं कमेंट केली की, ''अगं बाई ही काय पोझ आहे?'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''मुली कितीही मॉड झाल्या आणि फॉरेनला गेल्या तरीसुद्धा त्या पायातले पैंजण घालायला विसरत नाहीत''.