The Kashmir Files Unreported: गेल्यावर्षी सर्वाधिक चर्चा होती ती म्हणजे 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाची. आता या चित्रपटाचा अजून एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सज्ज झाले आहेत. 'द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेटेड' नावाचा चित्रपट येतो आहे. ज्याची घोषणा विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून केली आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटातून नक्की काय पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटरवरून या भागाची घोषणा करत या चित्रपटाचा एक छोटासा टीझर प्रदर्शित केला आहे. त्यावर चाहत्यांच्या नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चाहत्यांना हा चित्रपट अगदी उत्सुकतेने पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मागच्या वर्षी या चित्रपटानं सोशल मीडियावर पुरता धुमाकूळ घातला होता. सोबतच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं तूफान कमाई केली होती. पाहता पाहता या चित्रपटानं बड्या बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले होते. त्यामुळे या चित्रपटाची चांगली क्रेझ निर्माण झाली होती. काश्मिरी पंडितांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला होता. इतके वर्षे दाबून ठेवलेले सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आले होते. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यातून या चित्रपटावरून वादही सुरू झाले होते. हा चित्रपट भाजपचा प्रोपोगंडा आहे अशी टीका या चित्रपटावर करण्यात आली होती. परंतु या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनीही आपली भुमिका वेळोवेळी मांडली होती. गेल्या काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री हे बॉलिवूडवर टीकाही करताना दिसत आहेत. याच वर्षी फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकन चित्रपटाला मिळूनसुद्धा फिल्मफेअर न स्विकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
हेही वाचा - दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!
या चित्रपटातून अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांनी भुमिका केल्या होत्या. यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटवरवरून आपल्या या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित केला आहे.
PRESENTING:
A lot of Genocide Deniers, terror supporters & enemies of Bharat questioned The Kashmir Files. Now bringing to you the VULGAR truth of Kashmir Genocide of Hindus which only a devil can question.
Coming soon #KashmirUNREPORTED. Be ready to cry.
Only on @ZEE5India… pic.twitter.com/DgGlnzSKwA
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 19, 2023
''बहुतांश नरसंहार नाकारणारे, दहशतवादी समर्थक आणि भारताच्या शत्रूंनी 'काश्मीर फाईल्स'वर प्रश्नचिन्ह उभे केले. आता तुमच्यासमोर काश्मीरच्या हिंदूंच्या नरसंहाराचे भयाण आणि कटू सत्य आणतो आहोत. ज्यावर फक्त एक सैतानच प्रश्न करू शकतो. लवकरच येत आहे #KashmirUNREPORTED. रडायला तयार रहा.'' असं विवेक अग्निहोत्री यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा चित्रपट zee5 वर प्रदर्शित होणार असून अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दिलेली नाही.
|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(19 ov) 131/7
|
VS |
BRN
135/3(17.1 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19 ov) 131/7
|
VS |
NEP
135/3(17.1 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.