Sushant Singh Rajput : महेश भट्ट 'या' फोटोंमुळे ट्रोल

सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर देखील टीकेची झोड. 

Updated: Jun 19, 2020, 12:08 PM IST
Sushant Singh Rajput : महेश भट्ट 'या' फोटोंमुळे ट्रोल title=

मुंबई :  अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. सुशांतच्या घरी स्वयंपाक करणारी, घरकाम करणारा आणि त्याचा मॅनेजर, सुशांतची बहीण आणि त्याचा मित्र अभिनेता महेश शेट्टी या सर्वांचे जबाब पोलिसांनी सोमवारी नोंदविले. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty)कसून चौकशी करण्यात आली. गुरूवारी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.

रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी महेश भट्टला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय त्यांचे काही जुने फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. २ वर्ष जुन्या या फोटोंमध्ये रियाच्या खांद्यावर महेश भट्टने डोकं ठेवल्याचं दिसून येत आहे. हे फोटो खुद्द रियाने २०१८ साली सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 

महेश भट्ट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..माझे बुद्धा..' असं लिहित, तुम्ही मला उंच भरारी घ्यायला शिकवलात असं देखील म्हटलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रियावर देखील टीकेची झोड उठवली आहे. 

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक सेलिब्रिटींची सोशल मीडियावरील चाहत्यांची संख्या कमी झाली आहे. तर अभिनेत्री कंगना  रानौत सारख्या कलाकारंच्या चाहत्यांच्या यादीत वाढ झाली आहे.