त्यापेक्षा आम्ही आयफोन घेतला असता... मलायकाचा 'हा' ड्रेस पाहून नेटकरी भडकले

मलायका आणि अर्जुनचा पार्टीतला लुक एका व्हिडीओतून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Jul 24, 2022, 03:37 PM IST
त्यापेक्षा आम्ही आयफोन घेतला असता... मलायकाचा 'हा' ड्रेस पाहून नेटकरी भडकले  title=

Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लव्ह लाईफ आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती नेहमी काहीतरी असं काही परिधान करते ज्यामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. काल मलायकाने असंच काहीसे केले. मलायका अरोरा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत फिल्ममेकर रितेश सिधवानीने आयोजित केलेल्या पार्टीत पोहोचली होती. या पार्टीतील तिचा लूक सर्वांनाच आवडला. मलायका आणि अर्जुनचा पार्टीतला लुक एका व्हिडीओतून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

चित्रपट निर्माता रितेश सिधवानी यांनी 'द ग्रे मॅन' या चित्रपटाची दिग्दर्शक जोडी रुसो ब्रदर्ससाठी एक खास पार्टी आयोजित केली होती. पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स आले होते. आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे मलायका पार्टीची शोजस्टॉपर ठरली. या पार्टीत मलायका अरोरा नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. या खास पार्टीसाठी तिने पर्पल बॅकलेस शॉर्ट मिनी ड्रेस घातला होता. त्याचसोबत तिने सिल्व्हर कलरची पर्सही घेतली होती. 

रुसो ब्रदर्ससाठी आयोजित केलेल्या या पार्टीतील मलायका आणि अर्जुन कपूरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ज्यावर युजर्स मलायकाच्या सुंदर ड्रेसचे आणि तिच्या ग्लॅमर स्टाइलचे कौतुक करताना दिसत आहेत. पण तिच्या ड्रेसच्या किंमतीमुळे काही लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले. लोकांनी तर लिहिलं की, ''यापेक्षा आयफोन खरेदी करणं आम्हाला परवडलं असतं'' 

मलायकाच्या ड्रेसची किंमत 1, 19, 776 रुपये आहे. हा ड्रेस कोणीही ऑनलाइन खरेदी करू शकतं. इतका महागडा ड्रेस परिधान केल्यामुळे मलायका नेटिझन्सच्या निशाण्यावर आली आहे. 

oops moments चीही झाली मलायका शिकार

मलायकाचा ड्रेस जितका आकर्षित होतो तितकाच तो बोल्डही होता. त्यामुळे तिच्या या तोकड्या कपड्यांमुळेही तिला ट्रोल करण्यात आले आणि तिच्या फॅशन सेन्सवर बोट उठवली गेली.