'मसान'ची अभिनेत्री याच्यासोबत करतेय लग्न

 ही अभिनेत्री आपल्यापेक्षा 5 वर्षाने लहान असलेल्या मुलाशी लग्न करत आहे. 

'मसान'ची अभिनेत्री याच्यासोबत करतेय लग्न  title=

मुंबई : 2018 या वर्षाची सुरूवात ही सेलिब्रिटीच्या लग्नानेच झाली. अनुष्काच्या लग्नानंतर अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा झाली. आता चर्चा रंगली आहे ती 'मसान' अभिनेत्री श्वेता त्रिपाठीच्या लग्नाची. 'मसान' आणि 'हरामखोर' या सिनेमांतून आपली छाप पाडलेली श्वेता त्रिपाठी अनेक वेब सिरीजमध्ये देखील आपल्याला दिसली. ही अभिनेत्री आपल्यापेक्षा 5 वर्षाने लहान असलेल्या मुलाशी लग्न करत आहे. 

 

At his own pace but still a step ahead of the human race! @_slowcheeta_ we you!!! We do!! #SlowCheeta roarrrrr on #dontholdback

A post shared by Shweta Tripathi (@battatawada) on

कोण आहे तो मुलगा 

श्वेता त्रिपाठी ही 'स्लो चिता'सोबत लग्न करत आहे. स्लो चिता म्हणजे रॅपर चैतन्य शर्मा या 5 वर्षाने लहान असलेल्या मुलाशी लग्न करत आहे. 32 वर्षाची श्वेता त्रिपाठी ही आपल्या 5 वर्षाने लहान असलेल्या म्हणजे 27 वर्षाच्या चैतन्यशी लग्न करत आहे. 

 

What's up Chips!?

A post shared by Chaitnya Sharma (@_slowcheeta_) on

अशी झाली एकमेकांची ओळख

आम्ही दिल्लीत एका कार्यक्रमासाठी भेटलो होतो. तेव्हा आमचं एकमेकांशी काही बोलणं झालं नाही. मात्र आम्ही जेव्हा पुन्हा यायला निघालो तेव्हा आमची सीट फ्लाइटमध्ये सोबतच होती. तेव्हा सकाळचे 5 वाजले होते. झोपायचा विचार होता मात्र आम्ही एकमेकांशी गप्पा मारत बसलो. 

 

What our dinner dates look like! @battatawada where are you now when I need you!?

A post shared by Chaitnya Sharma (@_slowcheeta_) on

असं केलं प्रपोझ 

चैतन्यने श्वेताला मुंबईत एका परफॉर्मिंग क्लब कुक्कू क्लबमध्ये प्रपोझ केलं. चैतन्यने श्वेताला सांगितलं की, एक नवीन प्ले आहे आणि तुला तो पाहिला पाहिजे. आणि तेव्हा ती पाहायला गेली आणि चैतन्यने प्रपोझ केलं. चैतन्यने आपल्या हातावर श्वेताच्या नावाचा टॅटू देखील काढला आहे. या दोघांच लग्न 29 जून ला गोव्यात दोन्ही परिवारांच्या उपस्थितीत होणार आहे. 

कोण आहे श्वेता त्रिपाठी 

श्वेता त्रिपाठी ही दिल्लीतील माजी सेक्रेटरी पी के त्रिपाठी यांची मुलगी आहे. 10 वर्षापूर्वी अभिनय करण्यासाठी ती मुंबईत आली होती. श्वेताने अनेक वर्ष थिएटर केलं आहे. तसेच सिनेमांमध्ये येण्याअगोदर तिने अनेक शॉर्ट फिल्म आणि जाहिराती देखील केल्या आहेत. नवाजुद्दीन सिद्धीकीसोबतची 'हरामखोर' ही फिल्म पहिली होती मात्र विक्की कौशलसोबत 'मसान' हा तिचा सिनेमा पहिला प्रदर्शित झाला.