नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली !

"लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे"

Updated: Jun 26, 2021, 05:14 PM IST
नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली ! title=

 मुंबई |  कलाकार मंडळी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत सोशल मीडिया अकाऊंटवर काही ना काही नवं पोस्ट करत असतात. कधी आगामी प्रोजेक्टची बातमी, तर कधी हटके अंदाजातील आपले फोटोज ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात..

नुकतेच स्मॉल स्क्रिनवरील 'माझा होशील ना' या मालिकेतील सईने ब्राईडल अंदाजातील काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत.. या फोटोंमध्ये सईने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर शोभून दिसेल अशी डिझाईनर ज्वेलरी घातली आहे.

सई अर्थात अभिनेत्री गौतमी देशपांडेचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग आहे.. त्यामुळे खास फॅन्ससाठी सईने हे फोटोशूट केलंय. सईला नवरीच्या पेहरावात पाहून अनेकांनी तिला लवकरच लग्न करुन टाक असा सल्ला देखील द्यायला सुरुवात केली.अनेकांनी कमेंट करत या फोटोला पसंती दर्शवली आहे.तिच्या या फोटोंची 

सध्या इंस्टाग्रामवर चांगलीच हवा पाहायला मिळतेयं.'माझा होशील ना' या मालिकेमुळे गौतमी घराघरात पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने तमाम रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.