मिका सिंग करणार उर्फी जावेदशी लग्न ? उर्फीच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने चर्चांना उधाण

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिजन सुरुये

Updated: Jun 1, 2022, 10:32 PM IST
मिका सिंग करणार उर्फी जावेदशी लग्न ? उर्फीच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने चर्चांना उधाण title=

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिजन सुरुये, विकी-कतरिना, आलीया-रनबीर, यांच्यानंतर आता गायक मिका सिंग सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या तयारीत आहे, लग्नासाठी चांगली मुलगी तो शोधतोय. अनेक अभिनेते- अभिनेत्रीं शुटिंगच्या सेटवरचं आपला जोडिदार निवडतात. मिका सिंगचं मात्र थोडं हटके आह. त्याने थेट राजेशाही स्वयंवर करायचं ठरवलंय.

अखेर त्यांनी लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या स्वयंवरची जोरदार हवा सोशल मिडियावर आहे. 'स्वयंवर-मिका दी वोहती' नावाचा शो सुरू होत आहे. या शोच्या माध्यमातून गायक नॅशनल टेलिव्हिजनवर त्याची जोडीदार शोधणार आहे. मिका सिंगची वधू शोधण्यात त्याचे काही मित्रही त्याला मदत करतील.

मिका सिंगच्या स्वयंवरला अनेक अभिनेत्रींची रांग लागलीये परंतू चर्चा आहे ती फक्त उर्फी जावेदच्या एन्ट्रीची. उर्फीचा फॅशनसेन्स एकदम हटके आहे. त्यामुळे ती नेहमीच सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनते. आता स्वयंवरमध्ये ती वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारेय.

नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या मदतीने मिका सिंगने आपल्या आयुष्याचा एक खास प्रवास सुरू केला आहे. आता या शोमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक, मिकाच्या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.  सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद मिकाच्या स्वयंवरला येणार आहे.

 उर्फी जावेद त्याच्या खास ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. मात्र, अनेकदा तीच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर ट्रोल होत असते. परंतू उर्फीचे चाहतेसुद्धा काय कमी नाहीत. तीचा फॅनबेस खुप मोठा आहे. तीचे चाहते तीच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी खुप उत्सुक आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फी जावेदने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली तर मिकाच्या 'स्वयंवर-मिका दी वोहती' या शोसाठी लोकांमध्ये उत्साह वाढेल. शोच्या लॉन्चिंगची बहुतेक तयारी पूर्ण झाली आहे. हा शो 19 जून रोजी स्टार भारतवर सुरू होणार आहे. आता मिकाची हमसफर होणारी मुलगी कोण असेल हे पाहावं लागेल. मिकाच्या भावी पत्नीला पाहण्यासाठी चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.