वयानं लहान अभिनेत्याला Dipika Padukone कडून Kiss; व्हिडीओ, फोटो व्हायरल

एक व्हिडीओही व्हायरल 

Updated: Jan 5, 2022, 01:57 PM IST
वयानं लहान अभिनेत्याला Dipika Padukone कडून Kiss; व्हिडीओ, फोटो व्हायरल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Dipika Padukone ) हिनं कायमच तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अशा या बी- टाऊनच्या 'मस्तानी'चा आज वाढदिवस. Deepika च्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनी कुठे तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर, तिच्या जीवनातील विशेष पैलूवर प्रकाशही टाकला आहे. 

सोशल मीडियावर या खास दिवशी एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ पाहून अनेकांच्याच नजरा त्यावर खिळत आहे. कारणंही तसंच आहे. 

मादक सौंदर्य आणि घायाळ करणाऱ्या अदा म्हणजे नेमकं काय हे दीपिकाच्या या व्हिडीओतून आणि फोटोतून पाहायला मिळत आहे. 

मुळात हा व्हिडीओ नवा नाही, पण फोटो नवे असल्यामुळं त्याची चर्चा जरा जास्तच होताना दिसत आहे. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ आणि फोटोमध्ये दीपिका तिच्याहून वयानं लहान असणाऱ्या एका अभिनेत्याला Kiss करताना दिसत आहे. 

रणवीरसोबत झळकलेल्या एका अभिनेत्यासोबत दीपिकाचे हे इंटिमेट सीन्स भलतेच चर्चेत आले. ज्यानंतर त्या दोघांची केमिस्ट्री सांगणारे फोटोही समोर आले. 

हे फोटो आहेत सिद्धार्थ आणि दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टचे. म्हणजेच  'गहराइयां' (Gehraiyaan) चित्रपटाचे. 

दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे 6 नवे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जिथं दीपिका आणि सिद्धार्थ यांची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे.