सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्येनंतर धोनीलाही बसला धक्का

2016 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारित 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Updated: Jun 16, 2020, 02:29 PM IST
सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्येनंतर धोनीलाही बसला धक्का title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वच जण हैराण असून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. माजी भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांतने जबरदस्त भूमिका साकारत अनेक चाहत्यांचं मन जिंकलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर महेंद्र सिंह धोनीलाही मोठा धक्का बसला आहे.

सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून धोनी अतिशय दु:खी झाल्याचं बिजनेस मॅनेजर आणि धोनीचे मित्र अरुण पांडेय यांनी सांगितलं. त्यांनी एक चॅनेलशी बोलताना सांगितलं की, 'मला विश्वास बसत नाही की असं काही झालं आहे. मी काही बोलण्याच्या मनस्थिती नाही. माहीदेखील अतिशय दु:खी आहे. ही अतिशय दु:खी करणारी घटना आहे.'

सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सलमान खान विरोधात रोष

 

2016 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारित 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांतने 9 महिन्यांपर्यंत माजी विकेटकीपर किरण मोरे यांच्यासह क्रिकेटचं ट्रेनिंग घेतलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटात सुशांतच्या जबरदस्त भूमिकेचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. या चित्रपटादरम्यान सुशांत, काही दिवस धोनीच्या घरीदेखील राहिला होता. सुशांतच्या अशा अचानक एक्झिटने धोनीलाही मोठा धक्का बसला आहे.

सुशांतच्या आठवणीत विवेक ऑबेरॉयचं खुलं पत्र, इंडस्ट्रीला सुनावलं

सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालातही त्याने आत्महत्याच केल्याचं स्पष्ट झालं.