सुशांतच्या आठवणीत विवेक ऑबेरॉयचं खुलं पत्र, इंडस्ट्रीला सुनावलं

विवेक ऑबेरॉयने शेअर केल्या वेदना, इंडस्ट्रीची ही कान उघडणी.

Updated: Jun 16, 2020, 09:36 AM IST
सुशांतच्या आठवणीत विवेक ऑबेरॉयचं खुलं पत्र, इंडस्ट्रीला सुनावलं title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या अंत्यदर्शनाला हजेरी लावल्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉय याने ट्विटरवर एक खुलं पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे विवेकने आपल्या मनातल्या सर्व वेदना लिहिल्या आहेत, ज्या त्याला अंत्यसंस्कारा दरम्यान आणि नेहमीच इंडस्ट्रीबद्दल वाटत आहेत. विवेकचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

विवेकने लिहिले की, "सुशांतच्या अंत्यसंस्कारात हजर राहताना खूप त्रास होत होता. कदाचित मी माझा अनुभव त्याच्या सोबत शेअर करून त्याच्या वेदना कमी करु शकलो असतो. मी स्वत: या प्रसंगातून गेलो आहे. तो खूप वेदनादायक आणि एकटा असू शकतो."

विवेक म्हणाला, "... पण मृत्यू या प्रश्नांची उत्तरे कधीच असू शकत नाही, आत्महत्या कधीच निराकरण होऊ शकत नाहीत. त्याने आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या मित्रांबद्दल आणि चाहत्यांविषयी विचार करणे थांबवले असते तर कदाचित आज हे नुकसान झालं नसतं. जे आता त्यांना वाटत आहे. लोक त्याच्याबद्दल किती काळजी करतात हे त्याला कळले असते."

"आज जेव्हा मी त्याच्या वडिलांना त्याच्या चितेला अग्नी देताना पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातील वेदना असह्य होत होत्या. जेव्हा मी त्याच्या बहिणीला रडताना आणि त्याला परत येण्यासाठी सांगताना पाहिलं तर माझ्या मनात खोलवर काय वेदना होत होत्या हे मी व्यक्त करु शकत नाही."

त्यांने लिहिले की, "मला आशा आहे की इंडस्ट्री स्वतःला एक कुटुंब म्हणवून घेईल, आपण स्वत:ला चांगले बनण्यासाठी बदलण्याची गरज आहे, आपण एकमेकांविषयी वाईट बोलण्याऐवजी एकमेकांना मदत करण्याची गरज आहे." अहंकार बाजुला ठेवून प्रतिभावान आणि विचलित झालेल्या लोकांकडे लक्ष देण्याची गरज आहे."

"हे कुटुंब खरोखर एक कुटुंब असणे आवश्यक आहे. जेथे एखाद्याची प्रतिभा पुढे आणली जाते, नष्ट केली जात नाही. आपल्या सर्वांसाठी हा एक वेक अप कॉल आहे. मला नेहमी हसत राहणाऱ्या सुशांतची आठवण येईल." मी प्रार्थना करतो की, माझ्या भावा तु जे दु:ख सहन केलं ते ईश्वराने परत घ्यावं. तुझ्या कुटुंबाला हे दु:ख सहन करणाची शक्ती देवो. आशा आहे की तु आता एका चांगल्या ठिकाणी असेल. कदाचित आम्ही तुला डिजर्व्ह करत नव्हतो."