नेस वाडियावरचा विनयभंगाचा गुन्हा रद्द

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील भांडण अखेर मिटलं. 

Updated: Oct 10, 2018, 10:56 PM IST
नेस वाडियावरचा विनयभंगाचा गुन्हा रद्द title=

मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील भांडण अखेर मिटलं. २०१४ मधील विनयभंगाचा गु्न्हा मागे घेण्यासाठी नेस वाडियानं याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी नेस वाडिया आणि प्रतिची ऑन कॅमेरा सुनावणी झाली. आणि नेसवरील गुन्हा रद्द कऱण्यात आला. नेस वाडीयानं माफी मागितल्यास गुन्हा मागे घेण्यास प्रिती तयार होती.. मात्र माफी मागण्यास नेस वाडीयानं गेल्या सुनावणीत नकार दिला होता. केवळ माध्यमांचं लक्ष वेधण्यासाठीच प्रितीनं हा आरोप केल्याचा दावा केला नेस वाडियानं केला होता. दोघांच्या युक्तीवादानंतर खंडपीठानं यावर सामोपचारानं तोडगा काढण्याचा सल्ला न्यायालयानं दिला होता.

मे २०१४ सालचा गु्न्हा मागे घेण्यासाठी नेस वाडीयाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३० मे २०१४ रोजी पंजाब किंग्स एलेव्हन आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल सामन्यादरम्यान प्रिती झिंटाला नेस वाडीयाने तिकीट वाटपावरुन आपल्या कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने सगळ्यांसमोर प्रितीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप प्रीतीने केला होता. या प्रकरणी विनयभंग आणि शीवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.