वयाने 25 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसले नागार्जुन, Actress नं स्वत: शेअर केले फोटो

त्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. 

Updated: Sep 17, 2022, 04:55 PM IST
वयाने 25 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसले नागार्जुन, Actress नं स्वत: शेअर केले फोटो title=

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन (Akkineni Nagarjuna) लवकरच बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानसोबत (Sonal Chauhan) 'द घोस्ट' (The Ghost) चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे, चित्रपटाचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नागार्जुन आणि सोनम चौहान यांच्यातली जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : एकीकडे मुलीच्या लग्नाची तयारी..., अथियाच्या सप्तपदीची तयारी सोडून सुनील शेट्टी डेटवर?

नागार्जुन आणि सोनल चौहान पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. मात्र, चित्रपटातील हे फोटो पाहिल्यानंतर ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. या फोटोंमध्ये आपण पाहू शकता की, अभिनेता अक्किनेनी नागार्जुननं सोनल चौहानला मिठी मारली आहे. (nagarjuna romacing with actress younger than almost 25 years) 

आणखी वाचा : Kriti Sanon 'बाहुबली' फेम या प्रसिद्ध अभिनेत्याला करते डेट? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

हे फोटो चित्रपटातील 'वेगम' गाण्यातील आहेत. चित्रपटात असलेलं हे रोमँटिक गाणं आहे. पोस्टर शेअर करण्यासोबतच सोनलनं लिहिले की, 'रोमान्ससाठी तयार व्हा. रोमँटिक सिंगल 'वेगम' 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालं. पोस्टरवर चाहते उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी ते खूप उत्सुक दिसत आहेत.

आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : Kajol ला खरंच दिसत नाही की...? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

या चित्रपटातील नागार्जुनच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचे तर तो इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. जबरदस्त अॅक्शन आणि रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर तिथे सोनल प्रिया नावाच्या एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाली ही नागार्जुन पेक्षा जवळपास 25 वर्षे लहान आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर काजल अग्रवाल व्यतिरिक्त सोनल चौहान, नागार्जुन, गुल पनाग, अनिखा सुरेंद्रन, मनीष चौधरी, रवि वर्मा आणि श्रीकांत अय्यंगार हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण सत्तारू यांनी केले आहे. हा चित्रपट 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.