Kriti Sanon 'बाहुबली' फेम या प्रसिद्ध अभिनेत्याला करते डेट?

जाणून घ्या कोण आहे हा लोकप्रिय अभिनेता...

Updated: Nov 29, 2022, 02:45 PM IST
Kriti Sanon 'बाहुबली' फेम या प्रसिद्ध अभिनेत्याला करते डेट?   title=

Kiri Sanon and Prabhas : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. क्रिती ही बाहुबली स्टार अभिनेता प्रभाससोबत (Prabhas) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. खरंतर हे करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' (Koffee with Karan 7) या शोमध्ये आल्यानंतर क्रितीनं प्रभासला कॉल केला होता. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधान आलं. या कपलला 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

आणखी वाचा : Kajol ला खरंच दिसत नाही की...? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास आणि क्रिती सेटवर एकमेकांसोबत खूप वेळ घालवतात. यासोबतच 'आदिपुरुष'चं शूटिंग संपूण एक महिना ओलांडला असूनही दोघे अजूनही एकत्र आहेत. क्रिती आणि प्रभास एकमेकांना कॉल आणि मेसेज करत असतात. त्या दोघांना एकमेकांसाठी भावना आहेत पण त्यांना कोणत्याही गोष्टीची घाई करायची नाही. 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

मोठ्या पडद्यावर प्रभास आणि क्रितीची नवीन जोडी पाहणे चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'आदिपुरुष'मध्ये प्रभास ' प्रभू राम' आणि क्रिती 'माते सीतेच्या' भूमिका साकारतात. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.