अभिनेत्रीच्या घरी चौथ्यांदा हलणार पाळणा; बेबी बंपसह फोटो व्हायरल

सिनेमांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्रीचं हे रुप पाहून चाहतेही थक्क  

Updated: Jul 29, 2022, 01:45 PM IST
अभिनेत्रीच्या घरी चौथ्यांदा हलणार पाळणा;  बेबी बंपसह फोटो व्हायरल title=

मुंबई : हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री  नीरू बाजवाने (Neeru Bajwa) आपला मोर्चा पंजाबी सिनेमांकडे वळवला आहे. नीरू कायम तिच्या प्रोजक्टमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नीरू लवकरचं चौथ्या बाळाला  जन्म देणार आहे. नुकताचं अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सध्या अभिनेत्री प्रेग्नेंसी फेज एन्जॉय करत आहे. 

नीरूला तीन मुली आहेत. आता ती चौथ्यांदा आई होण्यासाठी सज्ज झाल्याचं कळत आहे. नीरूने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटोंचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बेबी बंप दाखवताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण नीरुच्या पोस्टमध्ये ट्विस्ट असल्याचं कळत आहे. नीरूने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या आगामी सिनेमा 'ब्युटीफुल बिल्लो'चे पोस्टर शेअर केलं. पोस्टर शेअर करत तिने चाहत्यांना गोंधळात टाकणारं कॅप्शन दिल आहे. 

'बिल्लो आई होणार आहे. बिल्लोचे अभिनंदन करण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी ZEE5 वर या.' अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. नीरू खरोखरच आई होणार आहे की फक्त सिनेमाचं प्रमोशन करत आहे. हे अद्याप कळालेलं आहे.  असं असताना देखील चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नीरुच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर,   41 वर्षीय नीरूला 3 मुली आहेत. कॅनडामध्ये जन्मलेली नीरू ही पंजाबी सिने विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

देव आनंद यांच्या 'मैं सोलाह बरस की' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने टीव्ही विश्वात एंट्री घेतली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते.