कपड्यांमुळे भर कार्यक्रमात अनन्याची पंचाईत; अभिनेत्यामुळं वाचली, पाहा व्हिडीओ

त्यातून अनन्या पांडे हिने नुकतीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हजेरी लावली होती. 

Updated: Jul 29, 2022, 02:35 PM IST
कपड्यांमुळे  भर कार्यक्रमात अनन्याची पंचाईत; अभिनेत्यामुळं वाचली, पाहा व्हिडीओ title=

Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता विजय देवरकोंडा सध्या आपल्या आगामी 'लायगर' या चित्रपटाच्या निमित्ताने प्रमोशन्समध्ये बिझी आहेत. त्यामुळे सगळीकडे त्यांचीच चर्चा आहे. नुकतेच ते हैद्राबादला आपल्या चित्रपटाच्या तेलूगु भाषेतील ट्रेलरसाठी पोहचले होते. तेव्हा त्यांचे तिथे जंगी स्वागत करण्यात आले होते. अनन्या आणि विजयचे अक्षरक्षः पुष्पवर्षावात स्वागत करण्यात आले त्यामुळे आपल्या चाहत्यांचे एवढे प्रेम पाहून खुद्द अनन्या आणि विजयही भारावून गेले. सध्या त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवरूनही ते दोघं आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करत आहेत. त्यातून अनन्या पांडे हिने नुकतीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हजेरी लावली होती. 

नुकत्याच हैद्राबादला झालेल्या 'लायगर' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्यावेळी करन जोहर, रणवीर सिंगही उपस्थित होते. या ट्रेलर लॉन्चच्या वेळी एक प्रेस कॉन्फरन्स भरविण्यात आली होती. त्यादरम्यान अनन्या आणि विजयला चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या ट्रेलर लॉन्चच्यावेळी अनन्या हॉट लुकमध्ये दिसली होती. तिने ब्लॅक कलरचा कट आणि ओपन गाऊन घातला होता. हा तिचा गाऊन खूपच रिविलिंग होता. त्यामुळे आपला ड्रेस सांभाळता सांभाळता अनन्याचीही प्रचंड गोची झाली होती. यावेळी तिची मदत करायला चक्क तिचा कोस्टार विजय देवरकोंडा मदतीला धावून आला होता. 

प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी अनन्या सीटवर बसली होती. तेव्हा तिच्या कट गाऊनमुळे ती अनकम्फर्टेबल वाटत होती. तेव्हा आपला ड्रेस सावरण्यासाठी तिची फारच धादंल उडत होती अशावेळी सीटवर बसलेल्या अनन्याचा ड्रेस सांभाळण्यासाठी विजयने तिला थोडं उजवीकडे पाय करून बसण्याचा इशारा आपल्या हातांनीच केला. अनन्या आपल्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही हे त्याच्या लक्षात येताच तो तिच्या मदतीला धावून आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी विजयची खूप स्तुती केली असून त्याला 'जेंटलमन' अशी उपमाही दिली आहे. तोच ''आपण अशा ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल आहोत तर मग असा ड्रेस अभिनेत्री का घालतात?, त्याची गरज काय?'' असं सांगूनही अनेकांनी अनन्यालाही ट्रोल केलं आहे.