'बाबा इज बॅक'... संजयच्या 'भूमि'चं पोस्टर लॉन्च!

अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसाच्या दिवशी दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी 'भूमि' या चित्रपटाचे पोस्टर देऊन त्याचे अभिनंदन केले. 

Updated: Jul 30, 2017, 11:38 AM IST
'बाबा इज बॅक'... संजयच्या 'भूमि'चं पोस्टर लॉन्च!  title=

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसाच्या दिवशी दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी 'भूमि' या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करून संजयला शुभेच्छा दिल्यात. 'भूमी' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणं ही गोष्ट माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे... असं म्हणत कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. 

ओमंग कुमारने आपल्या ट्विट मध्ये 'हैप्पी बर्थडे बाबा' म्हणत वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्यात. 'भूमि'मध्ये संजय दत्तच्या मुलीची म्हणजेच 'त्रिशला'च्या भूमिकेत अभिनेत्री आदिती राव हैदरी दिसणार आहे.

हा चित्रपट २२ सप्टेंबर ला प्रदर्शित होणार आहे.

२०१६ मध्ये संजय दत्तची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर 'भूमि' या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय. यापूर्वी, आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटात संजय दत्त शेवटचा दिसला होता. भूमि चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलंय. या चित्रपटात संजय दत्तबरोबर आदिती राव ही मुख्य भूमिकेत असणार आहे. चित्रपटाचे शुटींग पूर्ण झालंय. हा चित्रपट २२ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.