'पद्मावत' वाद : अहमदाबादमध्ये मॉलमध्ये तोडफोड, दुकानात आग

 'पद्मावत' रिलीजला हिरवा कंदील मिळाल्यानंतर करणी सेना अधिकच आक्रमक झाली आहे. 

Updated: Jan 24, 2018, 07:59 AM IST
 'पद्मावत' वाद : अहमदाबादमध्ये मॉलमध्ये तोडफोड, दुकानात आग  title=

नवी दिल्ली : 'पद्मावत' रिलीजला हिरवा कंदील मिळाल्यानंतर करणी सेना अधिकच आक्रमक झाली आहे. 

आंदोलकांच्या एका समूहाने गुजरात, अहमदाबादमधील मेमनगर आणि थलतेज येथील मॉल आणि दुकानांची तोडफोड केली.

मॉलवर हल्ला 

'आम्ही बोर्ड लावला होता की आम्ही सिनेमा दाखवणार नाही आहोत, तरीही काही लोकांनी मॉलवर हल्ला केला.' असे मॉलचे मॅनेजर राकेश मेहता यांनी सांगितले.

सिनेमा पाहू नका 

हा सिनेमा पाहू नका. या व्यतिरिक्त अनेक सिनेमा पाहण्यासारखे आहेत. सलमान खानचा 'टायगर जिंदा है'  तुम्ही पाहू शकता, असे महाराष्ट्रातील नेते जयकुमार रावल यांनी सांगितले.

'...तर पैसे दिले असते'

पैसे कमाविण्यासाठी संजय लिला भन्साली समाजासमोर आला असता तर आम्ही त्याला १०-१२ लाख दिले असते.

पैसे कमावणे हेच त्याचे उद्दीष्ट्य आहे, कोणता इतिहास त्यांना दाखवायचा नाहीए, असेही त्यांनी सांगितले.