प्रदर्शनापूर्वीच 'पद्मावती'ने तोडला बाहुबलीचा रेकॉर्ड!

संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 3, 2017, 01:54 PM IST
प्रदर्शनापूर्वीच 'पद्मावती'ने तोडला बाहुबलीचा रेकॉर्ड! title=

नवी दिल्ली : संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट १-२ नव्हे तर तब्बल १५० देशांमध्ये   करण्यात येणार आहे. 'बाहुबली' चित्रपटाला ४००० स्क्रीन्स मिळाल्या होत्या. मात्र पद्मावती चित्रपटाने हा रेकॉर्ड मोडत ४५०० स्क्रीन्स मिळवल्या आहेत. विशेष म्हणजे ‘पद्मावती’ चीनमध्ये देखील दाखवण्यात येणार आहे. हा एक वेगळा रेकॉर्डच आहे. 'पद्मावती' चित्रपटाचे बजेट सुमारे १८० कोटी इतके होते. 

या चित्रपटात दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा महाराणी पद्मावतीच्या आयुष्यावर आधारित आहे. महाराणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण झळकणार आहे. तर राजा रतन सिंहच्या भूमिकेत शाहिद कपूर दिसेल. यात रणवीर सिंह नकारात्मक भूमिकेत दिसणार असून तो अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे.
अलीकडेच चित्रपटाचे  'घूमर' हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. 

चित्रपटाच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद बघता 'पद्मावती' 3D मध्ये प्रदर्शित केली जाईल, अशी चर्चा होती. हा प्रस्ताव पॅरामाऊंट पिक्चर्सने 'पद्मावती' चा ट्रेलर बघितल्यानंतर वायाकॉम 18 ला दिला. 
बॉलीवुडलाइफ.कॉमच्या वृत्तानुसार ‘पद्मावती’ 3D मध्ये प्रदर्शित करण्यात येईल. फिल्म निर्मात्यांच्यानुसार त्यामुळे चित्रपटाची   मज्जा दुप्पट होईल. 3D मध्ये रूपांतर करण्यासाठी हॉलीवुडचे टेक्नीशियन मदत करणार आहेत. त्याचबरोबर चित्रपट तामिळ आणि तेलगू भाषेतही डब केली जाईल.