''... यासाठी मी देवाचे आभार मानते'', लेकीच्या साखरपुड्यानंतर Parineeti Chopra च्या आईची पोस्ट चर्चेत

Reena Chopra on Parineeti Chopra Engagement: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा (Reena Chopra Emotional Post) दोन दिवसांपुर्वी संपन्न झाला. यावेळी परिणीती चोप्राच्या आईनं रिना चोप्रा हिनं आपल्या लेकीसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांची भावुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 16, 2023, 04:20 PM IST
''... यासाठी मी देवाचे आभार मानते'', लेकीच्या साखरपुड्यानंतर Parineeti Chopra च्या आईची पोस्ट चर्चेत title=
Photo - Reena Chopra | Instagram

Reena Chopra on Parineeti Chopra Engagement: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आप'चे खासदार राघव चड्ढा (Raghav Chaddh) यांचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या साखरपुड्याची चर्चा जोर धरू लागली होती. अखेर अगदी थाटामाटात त्याचा साखरपुडा झाला आहे. यावेळी त्यांच्या साखरपुड्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. सोबतच अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी आणि इतर सेलिब्रेटींनीही त्या दोघांना भरपुर शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी परिणीतीची आई रिना चोप्रानंही *Parineeti Chopra Mother Post) एक खास पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट वाचून तुम्हीही भावुक व्हाल. 

सध्या ही पोस्ट सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतो आहे. यावेळी त्यांनी लेकीला आणि जावयाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. रिना चोप्रा यांनी इन्टाग्रामवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी या पोस्टमध्ये खास शब्द लिहिले आहेत. रीना चोप्रा यांनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना खास शुभेच्छा दिल्या (Reena Chopra Emotional Post) असून त्यांच्यावर एक भावुक पोस्टही लिहिली आहे.

या पोस्टमध्ये रिना चोप्रा यांनी लिहिलंय की, ''तुमच्या आयुष्यात अशा काही घटना या घडत असतात की तुमचा देवावर विश्वास बसतो. तुमच्या आयुष्यात घडलेला हा गोड प्रसंग हाही एक त्यातीलच एक आहे. यासाठी मी देवाचे मनापासून आभार मानते. तसेच तुम्ही परिणीती आणि राघवला दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप धन्यवाद आणि आर्शीवादासाठी मन:पुर्वक धन्यवाद!''

हेही वाचा - शाहरुखचा चित्रपट पाहून Sudha Murthy असं काही म्हणाल्या की तोसुद्धा खडबडून जागा होईल...

यावेळी रिना चोप्रा यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यातील फोटो हे सोशल मीडियावर पोस्टही केले होते. यावेळी त्यांच्या संपुर्ण कुटुंबियांचे फोटोही त्यांनी शेअर केले होते. यावेळी परिणीतीच्या आई या खुपच सुंदर दिसत होत्या. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे मार्च महिन्यापासून एकत्र स्पॉट होत होते. तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. 13 मेला त्यांचा साखरपुडा होणार याचीही चर्चा जोरात सुरू झाली होती आणि अखेर त्यांचा साखरपुडा संपन्न झाला असून त्यांच्या साखरपुड्याचे (Raghav Chaddha and Parineeti Chopra Engagement Photos) फोटो हे सगळीकडेच व्हायरल झाले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परिणीती ही गेली 12 वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. काही दिवसांपुर्वी तिचा अमिताभ बच्चन यांच्यासमवेत असलेला 'उंचाई' (Parineeti Chopra Latest Film) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर आता परिणीतीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात ती मी आयुष्यात कधीही कुठल्याही नेत्याशी लग्न करणार नसल्याचे तिनं सांगितले होते. आज परिणीतीनं चक्क एका राजकीय व्यक्तीशीच साखरपुडा केल्यानं परिणीती ट्रोलही होताना दिसते आहे.