बॉलिवूडच्या यंगस्टर्ससोबत पीएम मोदींचा सेल्फी ट्रोल

पाहा काय म्हणाले युझर्स?

बॉलिवूडच्या यंगस्टर्ससोबत पीएम मोदींचा सेल्फी ट्रोल title=

मुंबई : गुरूवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉलिवूडच्या तरूण कलाकारांसोबत एक बैठक झाली. या बैठकीचा उद्देश होता, सिनेमाचा भारतीय संस्कृतीवर पडत असलेला प्रभाव आणि त्यामुळे होणारे बदल. या बैठकीसाठी बॉलिवूडची सगळी यंग ब्रिगेट सेना उपस्थित होती. 

बैठक संपल्यानंतर या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक सेल्फी घेतला. जो सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला आहे. या सेल्फीला खूप ट्रोल करण्यात आलं असून सोशल मीडियावर यावर भरपूर कमेंट्स येत आहेत. 

या कलाकारांसोबत घेण्यात आलेला सेल्फी अभिनेता रणवीर सिंहने क्लिक केला होता. जेव्हा हा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट झाला तेव्हा काहींनी कौतुक केलं तर काहींनी अनेक प्रश्न उभे केले. अनेकांनी या चमकत्या स्टार्ट्ससोब मोदींना देखील स्टार म्हटलं तर काहींनी करण जोहरच्या पाऊटवर मस्करी केली. 

एका युझरने प्रश्न विचारला की, सेल्फीमध्ये बॉलिवूडचे खान दिसत नाहीत? पण जेव्हा युझर्सने विवेक ओबेरॉय कुठे असा प्रश्न विचारला? तेव्हा तर हद्द पार झाली. विवेक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित बायोपिकमध्ये काम करत आहे.

मात्र एका युझरर्सने हद्दच पार केली सेल्फीमध्ये मोदी आणि करण जोहरला वगळता सगळ्या कलाकारांच्या डोक्यावर श्री राम अशी पट्टीलावून हा फोटो व्हायरल केला. पुढे लिहिलं की, हे सगळे कलाकार 2019 करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेले होते.

फिल्ममेकर आणि लेखिका अश्विनी अय्यर तिवारी या तरूण कलाकारांच्या संपूर्ण टीमसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेली होती. बैठकीत या गोष्टीवर चर्चा झाली की, सिनेमात काय काय बदल झाले पाहिजेत? तसेच बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाला. तसेच सिनेमाच्या तिकिटांवर असलेली जीएसटी कमी केल्यामुळे सर्व स्टार्सने पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ही बैठक अशा वेळी झाली ज्यावेळी तीन राजकीय घटनांवर आधारित सिनेमे चर्चेत आहेत. एक 'द ऍक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर, उरी - द सर्जिकल स्ट्राइक' आणि 'पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित बायोपिक'यांचा समावेश आहे.