रजनीकांत यांच्याविरोधातील 'तो' खटला रद्द

 चित्रपट निर्मात्याकडून हा खटला दाखल करण्यात आला होता. 

Updated: Dec 19, 2018, 09:53 AM IST
रजनीकांत यांच्याविरोधातील 'तो' खटला रद्द title=

मुंबई : मंगळवारी सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अब्रुनुसकानीचा खटला रद्द करण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला. चित्रपट निर्मात्याकडून हा खटला दाखल करण्यात आला होता. पण, हे सारंकाही त्याने तात्पुरती प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं असून, एका प्रसिद्ध व्यक्तीची प्रतिमा मलिन केल्याचं म्हणत त्याना न्यायालयाकडून २५ हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला होता.  

चित्रपट निर्माता मुकुचंद बोथरा या चित्रपट निर्मात्याने केलेल्या आरोपांनुसार रजनीकांत यांच्या मुलीचे सासरे कस्तुरी राजा यांनी त्यांच्याकडून ६५ लाख रुपय़े उधार घेतले होते. ही रक्कम कस्तुरी राजा यानी परतवली नाही, तर रजनीकांत तिची परतफेड करतील असं आश्वासनही राजा यांनी दिल्याचं बोथरा म्हणाले होते. ,

बोथरा यांनी खडंपीठाकडे रजनीकांत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून आपण पैसे मागत असल्याच्या त्यांच्या आरोपामुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचं बोथरा म्हणाले होते. सदर प्रकरणी न्यायायालयाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला असून, आता या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे. 

दरम्यान, न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयामुळे आता याविषयीच्या चर्चांनाही पूर्णविराम लागला आहे. सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांकडे  आणि राजकीय कारकिर्दीकडे पूर्ण लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ते '२.०' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामागोमागच आता ते 'पेटा' या चित्रपटातून पुन्हा एका नव्या रुपात चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.