...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्य

खासदार उदयनराजे भोसले हे पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यांना मतदान करा असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 11, 2024, 05:04 PM IST
...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्य title=

Udayanraje Bhosale : लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. बीड लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजे भोसले बीडमध्ये तळ ठोकून आहेत. मुंडे कुटुंबीयांशी उदयनराजेंचे खूप जवळचे संबंध असून पंकजा यांच्या प्रचारासाठी उदयन राजे मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यांचा प्रचार करताना उदयनराजे भोसले बीडच्या जनतेसमोर रडले.  

पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही तर मी राजीनामा देईन असे  उदयनराजे म्हणावे.  उदयनराजे ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पंकजा मुंडे यांना जिकून आणण्याचा निर्धारच व्यक्त केला. पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही तर मी राजीनामा देईन  आणि त्यांना साता-यातून निवडून आणेन, असं विधान उदयनराजे भोसले यांनी केले. 

बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारसभेत उदयनराजे बोलत होते. यावेळी बोलतना उदयनराजे भावूक झाले. बीडच्या जनतेसमोर त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. तर नेहमीप्रमाणे त्यांनी कॉलर उडवत पंकजांना मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे जनतेसमोर नतमस्तक झाले. पंकजा ताईला निवडून नाही दिल तर माझ्याशी गाठ आहे असं देखील राजे म्हणाले. 

बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात लढत

बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध पवार गटाचे बजरंग सोनावणे अशी लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी बड्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणेंसाठी शरद पवारांची सांगता सभा बीडमध्ये होणार आहे. सोनावणेंना पंकजा मुंडेंचं आव्हान आहे. तर दुसरीकडे बहीण पंकजा मुंडेंसाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात उतरला आहे. पंकजांना निवडून आणण्यासाठी धनंजय मुंडेंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आज बीडमध्ये पवार विरुद्ध मुंडे असा प्रचार पाहायला मिळतोय.

...तर मुंडे साहेबांना निवडूनच दिलं नसतं; मनोज जरांगें यांचे सूचक विधान

मराठा समाज जातीवाद असता तर मुंडे साहेबांना निवडूनच दिलं नसतं, असं सूचक विधान मनोज जरांगेंनी केलंय. मराठ्यांना तुम्ही विरोधक समजत असाल तर मग ते तुम्हाला कसे निवडून देतील असं सूचक विधान जरांगेंनी मुंडे बहिण-भावाला उद्देशून केलंय. माजलगाव इथल्या संवाद बैठकीत जरांगेंनी पंकजा आणि धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय.