'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत दिसणार रामदास स्वामींची भूमिका

संभाजी मालिकेत रामदास स्वामींचं होणार दर्शन...

Updated: Jul 12, 2018, 11:34 AM IST
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत दिसणार रामदास स्वामींची भूमिका

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने सध्या पंसती मिळत आहे. मालिकेमध्ये आतापर्यंत महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. आता या मालिकेत लवकरच रामदास स्वामी यांचा प्रसंग दाखवण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाच रामदास स्वामी यांचं खूप मोठं स्थान आहे. त्यामुळे आता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत रामदास स्वामी यांची भूमिका दिसणार आहे. याबाबत अनेकांना उत्सूकता आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने अनेक समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप पंसती मिळते आहे. शुक्रवारी हा भाग दाखवण्यात येणार आहे.

पाहा मालिकेचा एक छोटासा भाग