रणबीर कपूर हा सारखं अनुष्का शर्माच्या कपड्यांशी का खेळतं असतो?

बॉलिवूडचा 'रॉकस्टार' म्हणजेच अभिनेता रणबीर कपूर.

Updated: Apr 25, 2021, 01:06 PM IST
रणबीर कपूर हा सारखं अनुष्का शर्माच्या कपड्यांशी का खेळतं असतो? title=

मुंबई : बॉलिवूडचा 'रॉकस्टार' म्हणजेच अभिनेता रणबीर कपूर. एक सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.  रणबीर बऱ्याच वेळा त्याच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाइफ आणि रिलेशनशीपमुळे चर्चेत असतो.  रणबीरने त्यांच्या वेगळ्या अंदाजाने आणि सेंस ऑफ ह्यूमरने चाहत्यांचे मन जिंकलं आहे. सध्या सोशल मीडियावर रणबीरचे असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये तो अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ड्रेससोबत खेळताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Access (@bollywoodaccess)

हा व्हिडिओ रणबीर आणि आनुष्काच्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रमोशन  दरम्यानचा आहे. ज्यामध्ये रणबीर मुलाखत सुरू असताना अनुष्काच्या कपड्यांसोबत खेळताना दिसत आहे. पण अनुष्काला याचं काही भान देखील नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. रणबीरचं असलं वागणं चाहत्यांच्या चांगलचं पसंतीस पडलं आहे. 

'ऐ दिल है मुश्किल'  चित्रपटात रणबीरने  अयान ही भूमिका साकारली होती, तर  अनुष्काने अलाजीच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. चित्रपटातील त्या दोघांची मैत्री उत्तम रित्या पडद्यावर दाखवण्यात आली होती. अनुष्का शर्माने मुलाखतीत सांगितलं, की ती रणबीर कपूरला त्याच्या बालिश स्वभावामुळे फार ओरडली. शिवाय रणबीरच्या आजू-बाजूला राहिल्यामुळे मला विश्वास झाला आहे की मी चांगली आई नक्कीचं होईल, असं देखील अनुष्का म्हणाली.