रणबीर कपूर Vs कोण? Animal Park मध्ये नव्या व्हिलनची एंट्री, बॉबी देओलची जागा घेणार!

Animal Park : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' चित्रपटात हा अभिनेता करणार बॉबी देओलला रिप्लेस... कोण आहे तो अभिनेता एकदा पाहाच

दिक्षा पाटील | Updated: Feb 29, 2024, 04:25 PM IST
रणबीर कपूर Vs कोण? Animal Park मध्ये नव्या व्हिलनची एंट्री, बॉबी देओलची जागा घेणार! title=
(Photo Credit : Social Media)

Animal Park : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. चित्रपटाच्या पटकथेसोबतच चित्रपटाच्या अॅक्शन सीन्स सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या चित्रपटाला मिळालेलं यश पाहता आता दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. आता 'अ‍ॅनिमल पार्क' विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटाविषयी अनेक नवीन अपडेट्स समोर आल्या आहेत. आता अशी चर्चा रंगली आहे की 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात बॉबी देओललं खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याचे या चित्रपटात निधन झाल्याचे समोर झाले. तर आता त्याच्या दुसऱ्या भागात खलनायकाच्या रुपात कोण दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे हा कलाकार...

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाच्या आगामी 'अ‍ॅनिमल पार्क' विकी कौशलची एन्ट्री होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल महत्त्वाच्या म्हणजेच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, विकी कौशलच्या एन्ट्रीविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जर ही बातमी खरी असेल तर विकी आणि रणबीरला एकत्र पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकी कौशल आणि रणबीर कपूर हे बेस्ट फ्रेंड्स आहेत. दोघांनी या आधी एकत्र काम केलं आहे. त्यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केलं हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तो संजू हा चित्रपट आहे. या चित्रपटात विकीनं रणबीरच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका साकारली होती. आता ते दोघं 'लव एंड वॉर' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साली हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अशात जर 'अ‍ॅनिमल पार्क' मध्ये जर विकी कौशलची एन्ट्री झाली तर दोघांच्या चाहत्यांना फार आनंद होईल. मात्र, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगानं हा निर्णय घेतला असेल तर बॉबी देओलच्या चाहत्यांना नक्कीच वाईट वाटेल. 

हेही वाचा : 'ते सेटवर मारहाण करायचे आणि...'; अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

दरम्यान, 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपट वडील आणि मुलाचे नाते दाखवण्यात आले आहे. वडिलांचे प्रेम मिळावे म्हणून एक मुलगा किती प्रयत्न करतो हे त्यात दाखवण्यात आले आहे.