'दुर्दैवाने कोविड आला अन्...', राणी मुखर्जीने सांगितला पतीच्या संघर्षाचा किस्सा

Rani Mukherjee : चार वर्ष उलटूनही कोरोनाचे दिवस अद्याप विसरता येत नाही. कोरोना काळात सर्वसामान्यांना उपासमारीची वेळ आली होती, तर काहींना आर्थिक नुकसान सोसावे लागले. अशाचं कटु आठवणी बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जीने शेअर केल्या आहेत. 

Updated: Mar 6, 2024, 04:20 PM IST
'दुर्दैवाने कोविड आला अन्...', राणी मुखर्जीने सांगितला पतीच्या संघर्षाचा किस्सा title=

Rani Mukherjee Statement : जगात कोरोनाचं सावट होतं तेव्हा प्रत्येक जण नैराश्यात गेला होता. लॉकडाऊनमुळे कोणाची नोकरी गेली, तर कोणी आपल्या माणसांपासून दूर राहत होतं. या महामारीचा फटका जसा सामन्यांना बसला तसाच फटका कलाकारांनी बसला होता.  याला मनोरंजन विश्व काही अपवाद नव्हतं. 

लॉकडाऊनमुळे रीलीज होण्याच्या तयारीत असलेले सिनेमे  सिनेमागृहात बंद झाली म्हणून काही ओटीटीवर आली. तर काही सिनेमा तशीच पडून राहिली. त्यामुळे मनोरंजन विश्वाचही आर्थिक नुकसानाला सामोरे जावं लागल. कोरोना काळातील आठवणी सांगताना बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी भावुक झाली.  कोविडच्या काळात लॉकडाऊन असल्याने बरेच सिनेमे हे लोकांपर्यंत पोहोचले नाही. या काळात मी आणि माझा नवरा (YRF)यशराज फिल्मचे चेअरमन आदित्य चोप्रा मोठ्या मानसिक तणावात होतो. 2020 हे वर्ष इतरांप्रमाणे आमच्यासाठीही आव्हानात्मक ठरलं. लॉकडाऊनमुळे आमचं आयुष्य पुर्णत: बदलून गेलं. 

आदित्य चोप्राने कोविडकाळात नवे सिनेमा ओटीटीवर रीलीज केले नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर सिनेमे थिएटरमध्ये रीलीज करण्यात आले. मात्र हे सिनेमे बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसानाचा फटका बसला.  पुढे राणी मुखर्जी म्हणाली, ओटीटीवर सिनेमे रीलीज केले जातं होते तेव्हा आदीत्यचं म्हणणं होतं की बॉक्सऑफिसवर हे सिनेमे खूप चालतील. मात्र सिनेमा फ्लॉपप्रमाणे आदित्यच्या ही अपेक्षा फ्लॉप ठरल्या. त्यामुळे आमच्या कंपनीसमोर खूप मोठं आव्हान होतं. 

पुढे राणी म्हणते की,  “कोविडदरम्यान आदित्यचे हे काही बिग बजेट चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. दुर्दैवाने कोविड आला अन् या सगळ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अंधारातही आशेचा किरण दिसावा तसं पठाण सिनेमाच्या यशामुळे आम्हाला पुन्हा नव्याने काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. शाहरुख आणि दीपिकाच्या पठाण सिनेमाला फक्त भारतातल्याच नाही तर संपूर्ण जागातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. त्यामुळे यशराज फिल्म कंपनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करु शकली.  YRF यशराज फिल्मने  कोविडनंतर बंटी और बबली 2, रणवीर सिंह सोबत जयेशभाई जोरदार सिनेमा केला होता. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फक्त 17 करोडची कमाई करू शकले.  अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही, मात्र शाहरुख खानच्या ‘पठाणने'  बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.