निर्भिड राणीचा 'मर्दानी' अंदाज

 'मर्दानी २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Updated: Sep 30, 2019, 04:29 PM IST
 निर्भिड राणीचा 'मर्दानी' अंदाज title=

मुंबई : महिलांना साक्षात देवीचं रूप समजतात. पण याच महिला आताच्या काळात सुरक्षीत नाहीत. अत्याचार, बलात्कार यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक घडलेल्या घटनांवर चित्रपटं देखील साकारण्यात आले आहेत. अभिनेत्री राणी मुखर्जीच्या आगामी 'मर्दानी २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'इतना मारूंगी की तेरी त्वचा से तेरी उम्र का पता भी नहीं लगेगा.' अशी तंभी देत एका अपराध्याला मारताना दिसत आहे.  

चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. ‘मर्दानी २’ चित्रपट 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 'मर्दानी' चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी केले होते. याआधी प्रदीप सरकार यांनी ‘लागा चुनरी में दाग’ आणि ‘लफंग परिंदे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.  

‘मर्दानी २’चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरेण करणार आहेत. गोपी पुथरेण या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करणार आहेत. १३ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०१८ मध्ये राणीचा 'हिचकी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले होते.