सुपरस्टार रणवीरने दोन महिन्यांपासून दिलाच नाही ड्रायव्हरचा पगार

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून आणखी एका कारणाने तो चर्चेत आहे.

Updated: Oct 2, 2017, 08:13 PM IST
सुपरस्टार रणवीरने दोन महिन्यांपासून दिलाच नाही ड्रायव्हरचा पगार title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून आणखी एका कारणाने तो चर्चेत आहे.

रणवीर सिंह हा मोठ्या सिनेमांसाठी करोडों रूपये चार्ज करतो. पद्मावतीसाठी त्याने ८ कोटी घेतले. इतके पैसे असूनही गेल्या दोन महिन्यांपासून त्याने ड्रायव्हरचा पगार दिला नाहीये. 

स्पॉटबॉयने दिलेल्या वॄत्तानुसार, ‘पद्मावती’च्या शूटिंग दरम्यान रणवीर सिंहचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरमध्ये भांडण झालं. त्यानंतर माहिती समोर आली की, गेल्या २ महिन्यांपासून ड्रायव्हरचा पगार दिला गेला नाही. ‘पद्मावती’ शूटिंग दरम्यान, ड्रायव्हर सूरज पालहा त्याच्या मॅनेजरकडे पगार मागत होता. गेल्या दोन महिन्यांचा ८५ हजार इतका पगार त्याला दिलाच नव्हता. 

मात्र, मॅनेजरने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर रणवीरच्या बॉडीगार्डने ड्रायव्हरला मारण्यास सुरूवात केली. हे प्रकरण इतकं पेटलं की, स्वत: संजय लीला भन्साली यांना येऊन भांडण सोडवावं लागलं. ड्रायव्हरला लगेच नोकरीवरून काढण्यात आलं. आणि त्या ड्रायव्हरला सांगण्यात आलं की, त्याला त्याचा पगार एका दिवसात मिळेल.