Rekha Love Story : बिग बीच नव्हे, 'या' अभिनेत्यावरही होता रेखा यांचा जीव; पाहा कोणी समोर आणलं नाव

Rekha :  रेखा आणि अमिताभ यांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. पण अमिताभ यांच्याशिवाय त्यांचं अजून एका अभिनेत्यावर हृदय आलं होतं. 'घर' आणि 'सिलसिला' हे त्यांचे दोन चित्रपट आहेत, ज्यांच्या नायकांसोबत रेखा यांचं खास नातं होतं. त्यापैकी एक हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार आहे, तर दुसरा या जगात नाही. 

Updated: Feb 14, 2023, 10:12 AM IST
Rekha Love Story :  बिग बीच नव्हे, 'या' अभिनेत्यावरही होता रेखा यांचा जीव; पाहा कोणी समोर आणलं नाव title=
rekha amitabh love story and Rekha love was also vinod mehra Tabassum tells the truth about Rekha and Vinod's relationship

Rekha Uncompleted Love Story :  बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री रेखा जितकी सुंदर कांजीवरम साडीत दिसते, तितकंच तिच्या आयुष्याचं रहस्य आहे. वैवाहिक सुख नाही, प्रेम करणारा हक्काचा माणूस नाही. आज व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day 2023) असूनही त्या एकट्याच...रेखा आणि अमिताभ (amitabh and rekha love story) यांची लव्ह स्टोरी ही बॉलिवूडमधील सगळ्यात गाजलेली स्टोरी...पण बिग बींशिवाय रेखा यांच्या मनात अजून एका अभिनेत्याने घर केलं होतं. असं म्हणतात की, यांनी लग्नही केलं होतं. जेव्हा त्या सासरी गेल्या तेव्हा सासूने रेखा यांचं स्वागत शिव्यांनी केली. ही जोडी ऑन-स्क्रीन पण खूप लोकप्रिय होती. तबस्सुम यांनी या लव्हस्टोरीचं रहस्य सांगितलं होतं. 

रेखाची लव्हस्टोरी (RekhaLove Story)

हा अभिनेता होता विनोद मेहरा...या दोघांनी गुपचुप लग्न केलं होतं असं म्हणतात. या लव्हस्टोरीबद्दल विनोद मेहराची जवळची मैत्रिण तबस्सुमने त्याच्या 'तबसूम टॉकीज' शोमध्ये सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, ''दोघेही प्रेमात होते, पण त्यांनी कधीच लग्न केले नाही.'' तबस्सुम असंही म्हणाल्यात की, 'त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले. ते जवळ आले, लग्नही करायचे होतं, पण दुःखाची गोष्ट म्हणजे तसं झालं नाही. विनोद मेहरा यांचं फक्त रेखावर प्रेम होतं, पण त्यांनी तीन लग्ने केली होती. (rekha amitabh love story and Rekha love was also vinod mehra Tabassum tells the truth about Rekha and Vinod's relationship)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''ही फक्त अफवा होती...''

प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखाने या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. 2004 मध्ये, सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखाने यांनी विनोद मेहरा यांना जवळचा मित्र असल्याचं म्हटलं. जेव्हा सिमीने रेखाला विचारले की, 'तू 1973 मध्ये विनोद मेहरासोबत लग्न केलेस का? जवळपास 2 महिने ती त्याच्याशी लग्नाच्या बंधनात अडकली होती का? या प्रश्नाचं उत्तर देताना रेखा म्हणाली, 'नाही, तुला असं म्हणायचं आहे की, मी फारुख अब्दुल्लाशी लग्न केलं होतं. कोणीही काहीही म्हणू शकतो. होय, तो माझ्या खूप जवळ आला आहे हे नक्की.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

3 लग्न, दोन घटस्फोट अन् मग...

विनोद मेहरा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आईच्या मर्जीने मीना ब्रोकासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, दोघांचाही लवकरच घटस्फोट झाला. यानंतर ते बिंदिया गोस्वामीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न केलं. दोघांच्या नात्यात कटुता आली आणि तिने विनोद यांना सोडले. यानंतर विनोद यांनी किरणशी लग्न केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत तिच्यासोबत राहिले. मात्र, 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने विनोद यांचं निधन झालं.