सुष्मिता, 'तो' आणि ताजमहाल

चर्चा तर होणारच...

Updated: Oct 28, 2018, 12:12 PM IST
सुष्मिता, 'तो' आणि ताजमहाल  title=

मुंबई : आपल्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी आणि फिटनेससाठी काही अभिनेत्री नेहमीच प्रकाशझोतात असतात. मुळात प्रेक्षकांमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नसते. अशाच अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे सुष्मिता सेन.

रॅम्पवर आत्मविश्वासाने चालणं असो किंवा मग दुर्गापूजेत मोठ्या मनोभावाने पूजा करत पारंपरिक नृत्यसाधना करणं असो. सुष्मिता प्रत्येक गोष्टीत आपला ठसा उमटवते. 

बी- टाऊनमधील ही अभिनेत्री सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे. 

गेल्या काही दिवसांपासून ती आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या मॉडेल रॉमन शॉलला डेट करत असल्याचं कळत आहे. इतकच नव्हे तर, त्याच्यासोबत ती पोहोचली आहे थेट आग्रा येथील ताजमहालाला भेट द्यायला. 

कित्येक पिढ्यांसाठी प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या या ताजमहालाच्या समोरच उभं राहून सुष्मिताने एक फोटो काढला असून त्यात रॉमनही तिच्यासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

तिने फोटोसोबत लिहिलेलं कॅप्शन हे अतिशय लक्षवेधी ठरत असून, त्या माध्यमातून जणू तिने आपल्या नात्याची कबुलीच दिल्याचं भासत आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिचे इतरही काही मित्रमंडळी दिसत आहेत. पण, रॉमनची उपस्थिती मात्र बरंच काही सांगून जात आहे. त्याशिवाय #love of life!!!#memorable #cherished हे हॅशटॅग पाहता सुष्मिताला नेमकं म्हणायचंय काय, हा प्रश्नच आता चाहत्यांच्या मनात घर करत आहे. 

काही दिवसांपूर्वीच एका फॅशन शोमध्ये या दोघांना एकत्रही पाहिलं गेलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्यातील मैत्री अधिकच खुलत गेली.  

रॉमन हा विविध फॅशन शोमध्ये अनेकदा रॅम्पवरही दिसला आहे. सुष्मितासोबचं त्याचं हे नातं दिवसागणिक आणखी घट्ट होत असून, आता येत्या काळात ही तथाकथित जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 
 
 
 

 

#romance returns!!! #tajmahal mmuuuuaaaah!!!!

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on