आमिर चीनचा लाडका; RSSची बोचरी टीका

सहसा कोणताही वाद किंवा अवाजवी चर्चांपासून दूर राहणाऱ्या अभिनेता आमिर खान सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. संघाच्या मुखपत्रातून त्याच्यावर निशाणा साधण्यात आल्यामुळं त्यांची आमिरविरोधी भूमिका आता सर्वांसमोर आली आहे. 

Updated: Aug 26, 2020, 11:46 AM IST
आमिर चीनचा लाडका; RSSची बोचरी टीका  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सहसा कोणताही वाद किंवा अवाजवी चर्चांपासून दूर राहणाऱ्या अभिनेता आमिर खान सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. संघाच्या मुखपत्रातून त्याच्यावर निशाणा साधण्यात आल्यामुळं त्यांची आमिरविरोधी भूमिका आता सर्वांसमोर आली आहे. 

तुर्कीच्या राष्ट्रपतींची पत्नी एमी एर्दोगान यांची भेट घेतल्यामुळं आमिरवर निशाणा साधण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर चीनमधील सत्ताधाऱ्यांचाही आमिर लाडका असल्याचा बोचरा टोलाही त्याला लगावण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर भारतविरोधी भूमिका असणाऱ्या राष्ट्रांबाबत आमिरची भूमिका अधोरेखित करत त्यावरही लेखातून थेट प्रश्न उपस्थित केले गेले. 

"Dragon's favourite Khan" नावाच्या एका लेखातून आमिरवर निशाणा साधण्यात आला. आमिरनं 'लाल सिंग चड्ढा', या त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण तुर्कीमध्ये केल्याबाबतही या लेखातून नाराजी व्यक्त करण्यात आली. चिनी उत्पादनांची जाहिरात करण्यावरुनही आमिरला धारेवर धरत याचा संबंध सध्या सध्या सुरु असणाऱ्या भारत- चीन तणावाशीही जोडला गेला. 

 

तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीसोबत छायाचित्र काढून प्रसिद्धीझोतात येत त्याला सदिच्छादूत व्हायचं आहे, अशा शब्दांत हिंदी भाषेतील लेखातून संघाकडून आमिरला खडे बोल सुनावण्यात आले. ''जिथं चीनमध्ये इतर कलाकारांचे चित्रपट अपयशी ठरतात तिथेच आमिरच्या चित्रपटांना चांगली लोकप्रियता मिळते.  त्याच्या 'दंगल' या चित्रपला तिथं चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण, सलमानच्या 'सुलतान' या चित्रपटाला मात्र फारशी पसंती मिळाली नाही'', असं लेखात लिहित आमिरविरोधी सूर आळवण्यात आला.