Saif Amrita: 'त्या घटनेनंतर सैफचं फ्रायपॅनने डोकं फोडाणार होती अमृता

सैफने असं काय केलं, ज्यामुळे अमृता म्हणाली, 'मला त्याचं डोकं फ्रायपॅनने फोडायचं होतं....', यावर सैफ म्हणाला...   

Updated: May 8, 2022, 10:57 AM IST
Saif Amrita: 'त्या घटनेनंतर सैफचं फ्रायपॅनने डोकं फोडाणार होती अमृता  title=

मुंबई : अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. वयातील अंतर, धर्म या सर्व गोष्टींना महत्त्व न देता त्यांनी त्यांच्यात असलेल्या प्रेमाच्या भावनेला महत्त्व दिलं आणि लग्न केलं. सैफ आणि अमृताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. लग्नाच्या काही वर्षातचं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या नात्याच्या जुन्या गोष्टी कायम चर्चेत असतात. 

एका मुलाखतीत अमृताने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सर्व काही सांगितलं आहे. मुलाखतीत अमृताला प्रश्न विचारला. सैफ जेव्हा इतर अभिनेत्रींसोबत सिनेमात काम करतो तेव्हा असुरक्षित वाटते का? 

Divorce नंतर अमृता सिंगनं मागितलेली रक्कम पाहून सैफला आकडी; म्हणाला, मी काही...

यावर अमृता म्हणते, "मी नाही म्हटलं तर ते खोटं ठरेल. आमच्या स्वतःच्या समस्या आहेत. आमच्या स्वतःच्या लढाया आहेत. मला वाटतं असुरक्षित.., असुरक्षित वाटणाऱ्या स्त्रीमध्ये काहीही चूक नाही."

अमृता पुढे म्हणाली, 'मी रडते आणि भांडते आणि इतर कोणत्याही स्त्रीप्रमाणे माझ्या देखील भावना आहेत. मला सैफचे डोके फ्रायपॅनने फोडायचं आहे."  यावर सैफने विनोद केला आणि म्हणाला, "तिने हे आधीच केले आहे...."