सैफ अली खान, सोहा अली खान आणि कुणाल खेमू घरी करतात या गोष्टीवर गॉसिप, ऐकून बेबोलाही बसेल धक्का

सैफ अली खान त्याच्या जबरदस्त सेंस ऑफ ह्यूमरसाठी ओळखला जातो. 

Updated: Jan 19, 2022, 05:08 PM IST
सैफ अली खान, सोहा अली खान आणि कुणाल खेमू घरी करतात या गोष्टीवर गॉसिप, ऐकून बेबोलाही बसेल धक्का  title=

मुंबई : सैफ अली खान त्याच्या जबरदस्त सेंस ऑफ ह्यूमरसाठी ओळखला जातो. तर त्याची बहीण सोहा अली खान देखील तिच्या भावापेक्षा कमी नाही. नुकतंच एका प्रश्नाच्या उत्तरात सोहा अली खानने असं उत्तर दिलं की, सगळेच चक्क झाले. खरंतर, त्याला विचारण्यात आलं की, तो, कुणाल खेमू आणि त्याचा भाऊ सैफ अली खान नेहमी जेवताना काय बोलता? याला उत्तर देताना सोहा अली खानने मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं.

नेहमी या मुद्यावर बोलतात
सोहा अली खान म्हणाली की, ते अनेकदा जेवणाच्या टेबलावर वारसाविषयी बोलतात. सोहा अली खान ही शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची सर्वात लहान मुलगी आहे. सैफ अली खान तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा असून त्याला सबा खान नावाची दुसरी बहीण आहे. सैफ अली खान आणि सोहा यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं असताना, सबा सुरुवातीपासूनच लाईमलाईटपासून दूर राहिली. ती ज्वेलरी डिझायनर आहे.

पटौदी पॅलेसमध्ये राहातात शर्मिला टैगोर
दुसरीकडे, जर आपण शर्मिला टागोर यांच्याबद्दल बोललायचं झालं, तर त्या हरियाणातील पतौडी पॅलेसमध्ये त्यांच्य फॅमिलीसोबत राहतात. गेल्या वर्षी 'द कपिल शर्मा शो'मध्ये सैफ अली खानने गंमतीत म्हटलं होतं की, शर्मिला टागोर सगळ्या संपत्तीचे पैसे सांभाळतात आणि खर्च करतात. खरंतर, कपिल शर्माने तांडव सिनेमाच्या प्रमोशन शूटिंगच्यावेळी त्याला प्रश्न केला होता की, त्याने वेब सीरिजमधून जास्त पैसे कमावले आहेत की, त्याच्या मालमत्तेमधून जास्त पैसे मिळाले आहेत. या प्रश्नावर तो गमतीने म्हणाला, 'ते सगळं माझी बघते.' यासोबतच तो म्हणाला होता, 'मी फक्त नावाचा नवाब आहे.