सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिल्यांदाच सोशल मीडियात प्रतिक्रिया

 सुशांतच्या फॅन्सना सपोर्ट करण्याचे आवाहन सलमानने आपल्या फॅन्सना केलंय. 

Updated: Jun 21, 2020, 07:53 AM IST
सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिल्यांदाच सोशल मीडियात प्रतिक्रिया title=

मुंबई : सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नेपोटीझ्मवर जोरदार चर्चा रंगतेय. सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर, करिना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान यांच्यावर चहुबाजुनी टीका होतेयं.   या सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरील फॉलोअर्स कमी झालेयत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरुन त्यांना ट्रोल केलं जातंय. ट्वीटरवर देखील सुशांत सिंह राजपूत नाव ट्रेंड होतंय. या पार्श्वभुमीवर सलमान खान पहिल्यांदाच बोललाय. सुशांतच्या फॅन्सना सपोर्ट करण्याचे आवाहन त्याने आपल्या फॅन्सना केलंय. 

ट्विटरवर आता सलमान खानची एक मुलाखत ट्रेंड करतेय ज्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबत आपण एखादा चित्रपट बनवत आहे का असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. यावर सलमान खान म्हणाला होता की, सुशांत सिंह राजपूत कोण आहे? मग त्याला सांगण्यात आले की महेंद्रसिंह धोनीची भूमिका साकारणार्‍या 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' चा अभिनेता.

दरम्यान सलमानच्या चाहत्यांनी #westandbysalmankhan हे हॅशटॅगवापरून ट्विट केले. आणि आपलं समर्थन दर्शवलं. ३ लाखाहून अधिक ट्विट सलमान खानच्या समर्थनार्थ केले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खानला लक्ष्य करणारे नेटकरी आणि सलमानच्या फॅन्समध्ये काही ठिकाणी तूतूमैमै झालेली दिसली. मी माझ्या सर्व फॅन्सना विनंती करतो की सुशांतच्या फॅन्ससोबत उभे राहा. त्यांच्या भावना समजून घ्या. वाईट भाषा वापरु नका. या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबाला सहारा द्या. आपला कोणी निघून जाणं हे खूप वेदनादायी असतं असं ट्वीट सलमानने केलंय. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानचे पोस्टर्स जाळण्यात आले. बिहारमध्ये सलमानच्या बिईंग ह्यूमन या आऊटलेटवर सुशांतच्या चाहत्यांनी हल्ला चढवला. जागोजागी लागलेले सलमानचे पोस्टर्सदेखील फाडून टाकण्यात आले. 

दबंगचा दिग्दर्शक आणि अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप याने सलमान आणि त्याच्या परिवारावर आरोप केलेयत. दरम्यान गायक सोनू निगम याने देखील सलमानवर हल्ला चढवला. दोन व्यक्तींचा संगीतक्षेत्रातही दबदबा असून कोणी काय गायचं हे ठरवलं जातं. यामुळे संगीत क्षेत्रावर परिणाम होईल. या क्षेत्रातही आत्महत्या होऊ शकते असेही सोनू निगमने स्पष्ट केले.