सलमान खानला 'या' हॉलिवूड सिनेमाच्या यशाची प्रतिक्षा

कोणता आहे हा सिनेमा 

सलमान खानला 'या' हॉलिवूड सिनेमाच्या यशाची प्रतिक्षा  title=

मुंबई : अभिनेता सलमान खानने हॉलिवूड स्टार सिलवेस्टर स्टॅलोनला त्याच्या आगामी सिनेमा 'क्रिड - 2' ला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने आशा केली आहे की, 'रॉकी', 'रेंबो' आणि 'एक्सपेडेबल्स' प्रमाणेच हा सिनेमा देखील हिट केला आहे. सलमान खानने मंगळवारी ट्विटरवर क्रिड - 2 या सिनेमाचा पोस्टर शेअर करून कॅप्शन लिहिलं आहे की, ऐकलं आहे की क्रिड - 2 लवकरच रिलीज होणार आहे. आशा करतो की, रॉकी, रेंबो आणि एक्सपेंडेबल्सप्रमाणेच हिट होणार आहे. 

क्रिड - 2 स्टीवन कॅपल जूनिअरद्वारे दिग्दर्शित स्पोर्ट्स ड्रामा आहे. हा क्रिडचा सिक्वल असून रॉकी सिनेमाची आठवी चैन आहे. यामध्ये मायकल बी जॉर्डन, टेसा थॉम्पसन, डॉल्फ लंडग्रिन, फ्लोरियन मंटीयनू, फिलिसिया राशद, आंद्रे वार्ड, वुड हॅरिस, ब्रिजिट नेलसन आणि मायलो वेंटीमिग्लियाचा देखील सहभाग आहे. 

सिलवेस्टर स्टॅलोनबद्दल बोलायचं झालं हॉलिवू़डमधील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. 1970 ते 1990 काळात हा लोकप्रिय होता. 6 जुलै 1946 जन्म झाला असून त्याने 3 लग्न केले आहेत.