सलमानसोबत दिसणारी 'ही' चिमुकली आहे कोटींच्या संपत्तीची मालकीण, लग्नात बुक केलं होतं अख्खं पॅलेस

Salman Khan :  सलमान खाननं सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर करत या चिमुकलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज हीच चिमुकली कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तुम्ही ही चिमुकली कोण आहे हे ओळखू शकता का? 

दिक्षा पाटील | Updated: Aug 3, 2023, 10:32 AM IST
सलमानसोबत दिसणारी 'ही' चिमुकली आहे कोटींच्या संपत्तीची मालकीण, लग्नात बुक केलं होतं अख्खं पॅलेस title=
(Photo Credit : Salman Khan Instagram)

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी त्याचं कुटुंब किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. सलमान नेहमीच त्याच्या कुटुंबासोबत वेळ व्यथित करताना दिसतो. बऱ्याच वेळा तो फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. नुकातच सलमाननं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जी मुलगी ती मुलगी सलमानच्या खूप जवळची आहे. त्यानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. इतकंच नाही तर नेटकरी त्यावर विविध कमेंट करत अर्पिताला शुभेच्छा देत आहेत.
 
सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. सलमाननं शेअर केलेला हा फोटो थ्रोबॅक फोटो आहे. या फोटोत सलमाननं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं असून त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केल्याचं दिसत आहे. तर त्याच्या शेजारी असलेल्या या मुलीनं पांढऱ्या रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे. यावेळी ही चिमुकली सलमानची करंगळी चावताना दिसत आहे. ही चिमुकली दुसरी कोणी नसून सलमानची बहीण बेबी अर्पिता आहे. अर्पिताचा आज वाढदिवस असल्यानं सलमाननं हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सलमाननं 'अर्पिता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!' असं कॅप्शन दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्पिता खान (Arpita Khan)

अर्पिता ही सलमान खानची दत्तक बहीण आहे. ती खूप लहाण असताना सलमान खानचे वडील सलीम खान तिला घरी घेऊन आले होते. इतकंच नाही तर अर्पिता ही खान कुटूंबासाठी लकी चार्म आहे असं म्हटले जाते. दरम्यान, अर्पिता मोठी झाल्यानंतर ती आयुष शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. त्यानंतर त्या दोघांनी त्यांच्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेत लग्न केलं. त्यांच्या लग्नासाठी हैद्राबादमध्ये तार फलकनुमा पॅलेस बूक करण्यात आलं होतं. अर्पिताच्या नेटवर्थ विषयी बोलायचे झाले तर तिची एकूण संपत्ती ही 134 कोटी असल्याचे म्हटले जाते. तर दुसरीकडे तिचा पती म्हणजेच आयुष शर्माच्या एकूण संपत्तीविषयी बोलायचे झाले तर त्याचं नेटवर्थ हे 15 कोटी असल्याचे म्हटले जाते. अर्पिताच्या एकूण संपत्तीत मुंबईतील एक मॅन्शन असून त्याची किंमत ही 10 कोटी आहे. अर्पितानं स्वत: हा मॅन्शन विकत घेतल्याचे म्हटले जाते. तर अर्पिता आणि आयुष हे दोघे मुंबईच्या खार परिसरात राहत असल्याचे म्हटले जाते. 

हेही वाचा : 'या' बालकलाकाराला तुम्ही ओळखलंत का? आज एका चित्रपटासाठी घेतो 100 कोटींचे मानधन

अर्पिता एक इंटेरिअर डिझायनर आहे. त्यातून ती सगळ्यात पैसे कमावते तर त्याशिवाय तिला अनेक स्पॉन्सर्शिप आणि जाहिरातींमधून पैसे मिळतात. सलमान खाननं अर्पिता आणि आयुष शर्माला त्यांच्या लग्नाच्या निमित्तानं रोल्स रॉयस फॅनटोम भेट केली होती. त्याची किंमत 4 कोटी असल्याचे म्हटले जाते. तर सलमान खाननं अर्पिताच्या मुलाला जन्मानंतर BMW 730 Ld M-Sport भेट केली होती.