साराचा पहिलाच धमाकेदार स्टेज परफॉर्मन्स

अभिनेत्री सारा अली खान गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहेत.

Updated: Oct 21, 2019, 02:25 PM IST
साराचा पहिलाच धमाकेदार स्टेज परफॉर्मन्स  title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहेत. फार कमी वेळात तिने कलाविश्वात स्वत:चा ठसा उमटवला आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये ती 'ट्विटर पर ट्रेंड हो गया' गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिच्या नृत्य अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Watch my pehli performance at the Nexa IIFA Awards on 20th October at 8 PM only on Colors TV  IIFA Facebook Page#IIFA2019 #IIFAAwards

 

साराने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'सिम्बा' चित्रपटाच्या हीट गाण्यावर ती थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'माझं गाणं, माझं पहिलं स्टेज परफॉर्मन्स' असे लिहिले आहे. 

इन्टरनेटवर साराचा पहिला स्टेज परफॉर्मन्स सर्व चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. 'आयफा अवॉर्ड २०१९' दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. सानाने 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 

सारा लवकरच 'लव आज कल' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये झळकणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन देखील झळकणार आहे. शिवाय अभिनेता वरूण धवणसोबत 'कुली नंबर १' चित्रपटात देखील सारा चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.