शाहरूखच्या नव्या सिनेमाची घोषणा..नाव ऐकून बुचकळ्यात पडाल

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा 'पठाण' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरूखने आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे.

Updated: Apr 20, 2022, 08:34 AM IST
शाहरूखच्या नव्या सिनेमाची घोषणा..नाव ऐकून बुचकळ्यात पडाल title=

मुंबईः बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा 'पठाण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाद्वार शाहरूख खान 4 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मात्र 'पठाण' प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरूखने आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे
सोशल मीडियावरून शाहरूखने अनोख्या अंदाजात याची घोषणा केली आहे. 

 या नव्या सिनेमातून शाहरूख पहिल्यांदाच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करणार आहे. शाहरूखने हिरानींसाठी ट्विटवर लिहिलंय.  सर तुम्ही काम तर सुरू करा, मी वेळेत पोहोचेल, नव्हे,मी सेटवरच राहणार. तुमच्यासोबत काम करायला खूपच उत्सुक आहे. अशा शब्दात शाहरूखने सिनेमाची घोषणा केली आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे, आणि या सिनेमाचं नाव आहे 'डंकी'. हो बरोबर नाव ऐकून बुचकळ्यात पडलात ना? शाहरूखनेही नावावरून कसा संभ्रम झाला याचा मजेशीर व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.

शाहरूख खानचा 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरूख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही  या सिनेमात झळकणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शाहरूखने त्याच्या चाहत्यांसाठी 'डंकी' या सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे 'डंकी'मध्ये शाहरूख नक्की कोणत्या भूमिकेत असेल याची त्याच्या चाहत्यांना मोठी उत्सकुता आहे.