बिग बींच्या नातवासाठी शाहरुखच्या लेकिचं 'खास' सेलिब्रेशन; ते खरंच डेट करतायत?

Suhana Khan Celebrated Agasty's Birthday : सुहाना खाननं अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केला आहे. त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 23, 2023, 01:58 PM IST
बिग बींच्या नातवासाठी शाहरुखच्या लेकिचं 'खास' सेलिब्रेशन; ते खरंच डेट करतायत? title=
(Photo Credit : Social Media)

Suhana Khan Celebrated Agasty's Birthday : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान लवकरच 'आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिची एक क्यूट बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुहाना तिच्या या आगामी चित्रपटामुळे तर चर्चेत आहेच. दुसरीकडे तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुहाना खान तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्यचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. 

खरंतर सुहानाही अगस्त्यसोबत 'आर्चीज' या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे सहकलाकाराचा वाढदिवस साजरा करताना सुहाना यावेळी दिसली. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकताच समोर आलेल्या व्हिडीओत सुहाना खान आणि अगस्त्य दिसत आहेत. तर सुहाना अगस्त्यच्या वाढदिवसासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. इतकंच नाही तर ती हसत काही बोलताना दिसते. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अगस्त्य नंदा कोण आहे? 

अगस्त्य नंदाचं बॉलिवूडशी खास कनेक्शन आहे. कारण त्याचे आजोबा हे अमिताभ बच्चन आहेत. अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदाचा मुलगा आहे. अगस्त्य हा सुहानासोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. अगस्त्य आणि सुहाना पहिल्यांदा एकत्र दिसले नाही तर या आधी देखील त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. सुहानानं गेल्यावर्षी अगस्त्यसोबत तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याशिवाय त्यांना अनेकदा पार्टीत एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. 

हेही वाचा : कोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये?

दरम्यान, 'आर्चीज' या चित्रपटातून फक्त अगस्त्य आणि सुहाना हेच स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही आहेत. तर त्यांच्यासोबत जान्हवी कपूरची धाकटी बहीण खूशी कपूर देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्या तिघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सुहानाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच वडील शाहरुख खानसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. पिंकव्हिलानं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं नाव किंग असणार आहे. त्याशिवाय या चित्रपटाच्या शूटिंगला पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. तर शाहरुख आणि सुहानाला एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या उत्सुकता आहे.