शनाया गॅरीला सोडून जाणार?

शनाया काय करणार? 

शनाया गॅरीला सोडून जाणार?  title=

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने चांगलच वळण घेतलं आहे. गुरूनाथने शनायाशी लग्न करून फक्त राधिकाला किंवा आपल्या कुटुंबियांनाच नाही तर प्रेक्षकांना देखील मोठा धक्का दिला. जेव्हा राधिका स्वतः घटस्फोट घेण्याची तयारी दाखवत तेव्हा गुरू मात्र मागे हटताना दिसत आहे. त्यामुळे गुरूनाथ आणि राधिकाच्या आयुष्यात आलेली शनाया या दोघांच्या आयुष्यातून जाणार की नाही याकडे साऱ्यांचाच लक्ष लागून असताना आता मालिकेत खराखुरा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

यासाठी शनाया घेणार एक्झिट?

शनाया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनिल या मालिकेतून एक्झिट घेत असल्याची चर्चा आहे. शनाया ही मालिका सोडत असल्याचं म्हटलं जात आहे. शनाया म्हणजे रसिका दिग्दर्शन आणि फिल्ममेकिंगचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार असल्याचं समजलं आहे. यासाठीच रसिका या मालिकेतून एक्झिट घेत आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी तिने या कोर्ससाठी अर्ज केला होता आणि यावर्षी तिला या कोर्ससाठी अॅडमिशन मिळाले आहे. मालिकेत नवा ट्विस्ट असतानाच शनाया मालिका सोडत असल्यामुळे आता शनायाची जागा कोण घेणार? की मालिका आता बंद होणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच रसिका सुनिलने देखील कोणतीच माहिती दिलेली नाही.

मालिकेत काय चाललंय?

राधिका गुरूनाथकडून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात जाते. पण तिथे गुरू तिच्यावर खोटे चुकीचे आरोप करतो. शनाया आणि गुरूच्या या कारस्थानात कळत नकळत का होईना पण गुरूची आई सहभागी होते. गुरूला पैसे देण्यासाठी ती स्वतःच्या बांगड्या आणि माळ विकते.