'तू पण नवऱ्याच्या घाणेरड्या चित्रपटांमध्ये...', राज कुंद्रासारखा मास्क घातल्यानं शिल्पा शेट्टीवर खालच्या भाषेत नेटकऱ्यांची कमेंट

Shila Shetty Wears Mask with Husband Raj Kundra : शिल्पा शेट्टीनं पती प्रमाणे मास्क घातल्यानं तिला नेटकऱ्यांनी खालच्या भाषेत ट्रोल केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 15, 2023, 10:44 AM IST
'तू पण नवऱ्याच्या घाणेरड्या चित्रपटांमध्ये...', राज कुंद्रासारखा मास्क घातल्यानं शिल्पा शेट्टीवर खालच्या भाषेत नेटकऱ्यांची कमेंट title=
(Photo Credit : Social Media)

Shila Shetty Wears Mask with Husband Raj Kundra : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या लूक्समुळे चर्चेत असतो. राज कुंद्राचे मास्क नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याच्या या मास्कमुळे त्याला नेटकऱ्यांनी मास्क मॅन असा टॅगही दिला आहे. आता शिल्पा शेट्टीला देखील मास्कचे वेड लागले आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं तर त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत शिल्पानं देखील मास्क घातला आहे. 

व्हूमप्ला या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राज कुंद्रा आणि शिल्पा कुंद्रा हे दोघे गाडीतून बाहेर येताना दिसले. आता या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष शिल्पानं वेधलं आहे. शिल्पानं देखील राज कुंद्रा सारखा मास्क परिधान केला आहे. त्यात त्या दोघांचा ऑल ब्लॅक लूक हा चर्चेत आहे. तर व्हिडीओच्या शेवटी फक्त शिल्पानं स्वत: चा चेहरा पापाराझींना दाखवला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट करत त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की ही उर्फी आहे का? दुसरा नेटकरी म्हणाला की राजची जादू. तिसरा नेटकरी म्हणाला की 'पार्टनरनं नेहमीच आपल्या साथीदारासोबत रहायला हवं.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'हे आहे ना पतीला सगळ्या गोष्टीत साथ देण्याला योग्य पद्धतीनं पार पाडणे.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'पावर रेंजर कपल द बेस्ट.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'हिने पतीच्या फिल्ममध्ये रोल साकारला असणार.'

Shila Shetty Wears Mask with Husband Raj Kundra gets trolled

शिल्पाचा आगामी प्रोजेक्ट

सोशल मीडियावर सक्रिय असणारी शिल्पा शेट्टीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्सचा भाग होणार आहे. या चित्रपटातून रोहित शेट्टी हा ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तर याचे नाव पोलिस फोर्स असे आहे. यात शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. तर दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं.