मराठमोळ्या 'महाराष्ट्र शाहीर' च्या गाण्यामुळं शिल्पा शेट्टीच्या डान्सला 'बहर'; पाहा Video

Shilpa Shetty Dance Viral Video: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिला मराठी गाण्याची भूरळ पडली असून तिने त्या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 9, 2023, 04:10 PM IST
मराठमोळ्या 'महाराष्ट्र शाहीर' च्या गाण्यामुळं शिल्पा शेट्टीच्या डान्सला 'बहर'; पाहा Video   title=
shilpa shetty dance marathi song

Shilpa Shetty Dance On Baharla Ha Madhumas Song: फिटनेस फ्रीक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa sheety song) सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी मोठ्या मोठ्या इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसते. बॉलीवूडची फिटनेस प्रेमी अशी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ओळख आहे. तिच्यासारखी अगदी फिट अभिनेत्री क्वचित बॉलिवूडमध्ये पाहायला मिळेल. चित्रपटांपासून शिल्पा दूर असली तरी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय सुरु आहे याची माहिती तिला असते. याचाच प्रत्यय तिने शेअर केलेल्या व्हिडीओमधून दिसून आला. 

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shaheer) या सिनेमाची आणि त्यातील गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि सना शिंदे मुख्य भूमिकेत आहेत. सोशल मीडियावर एका गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे, ते गाणे म्हणजे 'बहरला हा मधुमास नवा' (Baharla Ha Madhumas) की गाण्याने प्रेक्षकांने वेड लावले आहेत. प्रत्येकजण गाण्याच्या हुकस्टेपचे फॉलो करत व्हिडीओ शेअर करत आहे. देशातच नाही तर परदेशातही गाण्याची क्रेझ आहे. याच गाण्याची भुरळ बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa sheety Video) हिला पडली आहे. सध्या रिल्सवर व्हायरस होत असलेले 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील सुपरहिट गाणे 'बहरला हा मधुमास नवा' हे आहे. 

सध्या सोशल मीडियावर 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटातील 'बहरला हा मधुमास' या गाण्यावर अनेकजण वेगवेगळ्या स्टाइलमध्ये अनेकजण डान्स करत आहेत. पण आता या गाण्यावर हुक स्टेप करण्याचा मोह शिल्पा शेट्टीलाही अनावर झाला आहे. मूळ सिनेमात सना शिंदे हीने या गाण्यावर केलेल्या डान्स स्टेप वर शिल्पा शेट्टीदेखील थिरकली आहे. नेहमी जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करणाऱ्या शिल्पा शेट्टीने मराठी गाण्यावर डान्स केला. 

पाहा शिल्पाचा डान्स 

या व्हिडिओमध्ये मधुमास नवीन गाण्यावर शिल्पा अगदी सहज नाचताना दिसत आहे. शिल्पाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिल्पाच्या नृत्यकौशल्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. 

बहरला मधुमास नवा गाण केवळ देशातच नाही तर देशाबाहेर देखील लोकप्रिय झाले आहे. या गाण्यावर टांझानियाच्या किल्ली आणि नीमा या गाण्यातील डान्सचा व्हिडिओ शेअर केला. कायली आणि नीमाचा व्हिडिओ नेटिझन्सना आवडला. महाराष्ट्र शाहीर सिनेमातील हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे आणि ते अजय अतुल या लोकप्रिय संगीतकार जोडी यांनी संगीतबद्ध केले आहे.