शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना मारहाण

 शिल्पा शेट्टीचे फोटो काढण्याची खुप मोठी किंमत दोन फोटोग्राफर्सना चुकवावी लागली. केवळ फोटो काढले म्हणून त्यांना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉटेलच्या बाऊन्सर्सनी ही मारहाण केली असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनू आणि हिमांशु शिंदे हे दोन फोटोग्राफर्स जखमी झाले आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 8, 2017, 03:43 PM IST
शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना मारहाण title=

मुंबई :  शिल्पा शेट्टीचे फोटो काढण्याची खुप मोठी किंमत दोन फोटोग्राफर्सना चुकवावी लागली. केवळ फोटो काढले म्हणून त्यांना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

हॉटेलच्या बाऊन्सर्सनी ही मारहाण केली असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनू आणि हिमांशु शिंदे हे दोन फोटोग्राफर्स जखमी झाले आहेत. 

सेलिब्रिटी म्हटल की मीडिया, फोटोग्राफर्सचा गराडा आलाच. पण शिल्पा शेट्टीचे फोटो काढल्याने बाऊंसर्सनी फोटोग्राफरवर हात उचलावा एवढच नव्हे तर रक्त येईपर्यंत मारहाण करावी असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे  खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर असताना दोन फोटोग्राफर त्यांचा फोटो टिपण्याच्या प्रयत्नात होते.

 

पण  हॉटेलच्या बाऊंन्सर्सनी त्यांना बेदम मारहाण केल्याचे फोटोग्राफर्सनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  खार पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून दोन बाऊंन्सर्सना अटक केली आहे.