#MeToo आंदोलन बकवास - शिल्पा शिंदे

असं का म्हणाली शिल्पा शिंदे 

#MeToo आंदोलन बकवास - शिल्पा शिंदे  title=

मुंबई : जेव्हापासून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo आंदोलनची सुरूवात केली तेव्हापासून अनेक लोकांचे नाव समोर आले आहे. काही महिलांनी #MeToo बाबत बोलणाऱ्या महिलांना सपोर्ट करत आहे. ज्या हिम्मत करून आपली व्यथा मांडतील. अशात एक महिला समोर आली जिने #MeToo बकवास असल्याचं म्हटलं आहे. ती महिला कलाकार आहे लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 11 चिी विजेती शिल्पा शिंदे 

बकवास आहे #MeToo 

शिल्पा शिंदेने गेल्यावर्षीच 'भाबी जी घर पर है'चे निर्माता संजय कोहली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. पण #MeToo च्या प्रश्नावर मात्र ती वेगळीच बोलताना दिसतेय. तिला याबाबत प्रश्न विचारला असता, ती म्हणाली की जेव्हा ती घटना घडते तेव्हाच आवाज करायला हवा. कारण त्यानंतर बोलण्यात काही फायदा नाही. पुढे ती म्हणाली की, हे बकवास आहे. तुम्हाला त्याच क्षणी त्या प्रकरणावर मोठ्या बोललं पाहिजे. जर त्यानंतर बोलल्यानंतर भरपूर सोप आहे. मला पण माझ्या भूतकाळातून खूप मोठी शिकवण मिळाली आहे. 

Shilpa Shinde

इंडस्ट्रीला बदनाम करतात लोकं 

मात्र या सगळ्यात शिल्पा शिंदे सांगते की, इमानदारीने मी या प्रकरणावर बोलू इच्छित नाही. कारण आता जे काही होतंय ते इंडस्ट्रीला बदनाम करणार आहे. इथे कुणी ही या गोष्टीपासून अलिप्त नाही. इथे जे काही होतं ते सगळं म्युचल असून हरॅशमेंट सारखी कोणती गोष्टच नाही. लोकं एकत्र येऊन इंडस्ट्रीबद्दल चुकीचं बोलत आहेत.