Neha Kakkar च्या नवऱ्यासोबत हॉटेलच्या खोलीत घडली धक्कादायक घटना, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

खरंतर रोहनप्रीत सिंग शुक्रवारी रात्री हिमाचल प्रदेशातील मंडी येथील हॉटेलमध्ये थांबला होता.

Updated: May 15, 2022, 09:54 PM IST
Neha Kakkar च्या नवऱ्यासोबत हॉटेलच्या खोलीत घडली धक्कादायक घटना, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. नेहा कक्करचा नवरा म्हणजेच रोहनप्रीत सिंग एका हॉटेलमध्ये राहायला गेला असताना, त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे तो अस्वस्थ झाला आहे. एवढंच काय तर ही गोष्ट पोलिस स्टेशनपर्यंत देखील पोहोचली आहे. ज्यामुळे सोशल मीडियापासून सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

नक्की काय घडलं

रोहनप्रीत सिंग याचा सामान हॉटेलमधून चोरीला गेले. रोहनप्रीत सिंगने पोलिसांकडे यासंबंधी तक्रार नोंदवली. रोहनप्रीत या हॉटेलमध्ये एकटा होता, त्यावेळी त्याच्यासोबत नेहा नव्हती.

खरंतर रोहनप्रीत सिंग शुक्रवारी रात्री हिमाचल प्रदेशातील मंडी येथील हॉटेलमध्ये थांबला होता. त्यांने हे हॉटेल फक्त एक  रात्रीसाठी घेतले होते. जेणेकरून तो दुसऱ्या दिवशी प्रवास करण्यापूर्वी आराम करू शकतील.

परंतु त्याच रात्रीत रोहनप्रीत सिंगचे या हॉटेलमधील खोलीतून अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली. 

रोहनचं असं म्हणणं आहे की, तो रात्री खोलीत झोपला होता, तेव्हा त्याने ते सामान काढून ठेवलं होतं, परंतु जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याचं हे सर्व सामान टेबलावर नव्हतं. त्यांनी आपल्या चोरीची तक्रार पोलिसांत दिली आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

एसपी मंडी शालिनी अग्निहोत्री यांनी या चोरीला दुजोरा दिला आहे, तसेच रोहनची ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलीस हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत, तसेच हॉटेल कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.

रोहनप्रीत सिंग स्वतः एक गायक आहे आणि तो त्याच्या गाण्यांच्या आणि शोच्या संदर्भात टूर करत असतो. अलीकडेच नेहा कक्करने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉटेलच्या खोलीत रोहनप्रीत सिंगसोबत चहा घेत आहे. परंतु जेव्हा चोरीची घटना घडली तेव्हा मात्र नेहा रोहनसोबत नव्हती.