स्नायू पिवळे पडले होते आणि...; KK च्या मृत्यूनंतर कोलकाता पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

आता कोलकाता पोलिसांनी या संदर्भात नवी माहिती दिली आहे. 

Updated: Jun 5, 2022, 08:27 AM IST
स्नायू पिवळे पडले होते आणि...; KK च्या मृत्यूनंतर कोलकाता पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर title=

कोलकाता : गायक केके याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 31 मे रोजी कोलकातामध्ये केकेचं  निधन झालं. प्राथमिक अहवालानुसार, केकेचा मृत्यू हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झाला. मात्र आता कोलकाता पोलिसांनी या संदर्भात नवी माहिती दिली आहे. 

पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी सांगितलं की, सिंगरच्या हृदयाच्या वरच्या भागाच्या आसपासचे स्नायू देखील हृदयाच्या इतर भागांपेक्षा जास्त पिवळे होते. यामुळे आता एकच खळबळ माजली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅक्रोस्कोपिक तपासणीच्या आधारे असं सांगण्यात आलंय की, सिंगर केकेचा मृत्यू तीव्र कार्डिओजेनिक पल्मोनरी एडेमानंतर हायपोक्सियामुळे झाला. ही समस्या subarachnoid रक्तस्राव संबंधित आहे. सबआर्कनॉइड हेमरेज (Subarachnoid hemorrhage) हा एक प्रकारचा स्ट्रोक आहे, ज्यामुळे मेंदूमध्ये आणि आजूबाजूला रक्तस्त्राव होऊ शकतो.

मेडिकल रिपोर्टच्या अहवालांनुसार, सिंगरच्या सब-पेरीकार्डियल फॅटमध्ये वाढ झाल्याचं आढळून आले. इंटरव्हेंट्रिक्युलर धमनीच्या जवळ पिवळसर-पांढरे डाग आढळले. त्यामुळे शरीराचे आतील भाग आकुंचन पावले होते. त्याच्या डाव्या बाजूला कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आढळून आले, तर लहान रक्तवाहिन्यांमध्ये लहान ब्लॉकेज आढळले.

मात्र, एफएसएल आणि पॅथॉलॉजी विभागाकडून अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक केकेचं 31 मे रोजी कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झालं. शोदरम्यान त्याची तब्येत बिघडल्याने तो जमिनीवर पडला. यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.