दिवाळीनिमित्त श्रद्धाने दिला खास संदेश...

अभिनेत्री श्रद्धा कपूरने दिवाळीनिमित्त एक खास संदेश दिला आहे. श्रद्धाला प्राण्यांबद्दल खास प्रेम आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 14, 2017, 03:46 PM IST
दिवाळीनिमित्त श्रद्धाने दिला खास संदेश...  title=

 नवी दिल्ली : अभिनेत्री श्रद्धा कपूरने दिवाळीनिमित्त एक खास संदेश दिला आहे. श्रद्धाला प्राण्यांबद्दल खास प्रेम आहे. तिच्याकडे शायलो नावाचा एक कुत्रा देखील आहे. श्रद्धा नेहमीच प्राण्यांबद्दल समर्थन करत आहे. यंदा तिने प्राण्यांची काळजी चक्क ट्विटरवर शेअर केली आहे. प्राण्यांचा विचार करून फटाके न फोडण्याचा संदेश तिने दिला आहे. यासंदर्भात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते, "आवाज आणि वायुप्रदूषणाचा नाही तर रोषणाईचा सण जवळ येत आहे.... हवा स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करा आणि रस्त्यावरील प्राण्यांबद्दल संवेदनशील रहा."

 त्याचबरोबर श्रद्धा म्हणाली, "आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि मी फक्त इतके सांगू इच्छिते की, कृपया फटाके खरेदी करू नका आणि फोडू नका."  यामुळे फक्त प्रदूषण होत नाही तर रस्त्यावरील प्राण्यांना देखील त्याचा त्रास होतो. त्याचबरोबर श्रद्धाने तिच्या सगळ्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि दिवाळी आपल्या आपल्या परिवारासोबत सुरक्षितपणे साजरी करण्याचा संदेश दिला. 

सध्या श्रद्धा प्रभाससोबत 'साहो' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.