Sidharth Shukla Death: मृत्यूपूर्वीच्या रात्री काय झालं होतं सिद्धार्थ शुक्लाचं करण कुंद्राशी बोलणं?

सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पोलीस अधिक तपास करत आहेत

Updated: Sep 2, 2021, 09:27 PM IST
Sidharth Shukla Death: मृत्यूपूर्वीच्या रात्री काय झालं होतं सिद्धार्थ शुक्लाचं करण कुंद्राशी बोलणं? title=

मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) याचं आज मुंबईत निधन झालं. टीव्ही जगतातील अनेक स्टार्सनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पोलीस त्याचा तपास करत आहेत. दरम्यान, सिद्धार्थचा मित्र आणि अभिनेता करण कुंद्रा (karan kundra) याने मोठी माहिती दिली आहे.

करण कुंद्राने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले, 'मी काल रात्रीच सिद्धार्थशी संभाषण केले. मी त्याला सांगितलं की तो खूप शानदार काम करत आहे. मला विश्वासच बसत नाही की सिद्धार्थ आता आमच्यासोबत नाही. हे खूप दुःखद आहे. तु कायम स्मरणात राहशील मित्रा'

सिद्धार्थ आणि करण खूप जवळचे मित्र होते. ते अनेक वेळा एकत्र दिसले. सिद्धार्थच्या जाण्याने बॉलिवूड क्षेत्रातही हळहळ व्यक्त होतेय. 

मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच कळेल असे पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणात त्याच्या कुटुंबाचे आणि जवळच्या लोकांचे जबाब नोंदवले जाणार नाही. आतापर्यंत सिद्धार्थ शुक्लाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. 

सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबात कोण-कोण आहे

मुंबईत जन्म झालेल्या सिद्धार्थ शुक्लाचे वडील अशोक शुक्ला हे सिव्हिल इंजिनिअर आहेत आणि आई रीता शुक्ला गृहिणी आहेत. त्याच्या वडिलांनी भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये काम केले आहे. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत.