पंगा घेणं पडलं महागात... सगळ्यांसमोर सोनाक्षीनं मारली त्याच्या कानशिलात? Video viral

या व्हिडीओत सोनाक्षी असं म्हणते की... 

Updated: Oct 1, 2022, 06:56 PM IST
पंगा घेणं पडलं महागात... सगळ्यांसमोर सोनाक्षीनं मारली त्याच्या कानशिलात? Video viral  title=

Sonakshi Sinha Viral Video: सोनाक्षी सिन्हाच्या अभिनयाच्या आपण सर्वच प्रेमात आहोत. तिचा सोज्वळ अभिनय पाहून अनेक मुलांना तिच्यासारखीच कोणतरी मुलगी आपल्याही आयुष्यात असावी असं वाटतं. ती जेवढी शांत आणि सोज्वळ रूपेरी पडद्यावर तेवढी मात्र ती प्रत्यक्ष आयुष्यात नाही असेच दिसून येते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. (sonakshi sinha outburst goes viral in case toh banta hai show ritesh deshmukh reality show)

या व्हिडीओत सोनाक्षी असं म्हणते की माझ्या पंगा घेऊ नका. मी मोठ मोठ्या दबंग आणि चोरट्यासोबत काम केलं आहे. ती स्वतःहून या व्हिडीओत कबूल करते की तुम्ही माझं साधरूप पाहिलं आहे आता जर तुम्ही माझ्याशी पंगा घेतलात तर माझं रौद्र रूप पाहाल. 

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल पण घाबरू नका ही काही खरोखरची सोनाली नाही. रितेश देशमुखच्या केस तो बनता हैं या रिएलिटी शोमध्ये तिनं नुकतीच हजेरी लावली होती. या शोमधून ती एक गेम खेलत असते. या शोच्या एका भागात सोनाक्षीचा पारा चढतो आणि ती चक्क एका माण्साच्या कानाखाली मारते. तो व्यक्ती तिच्यासमोर दबंग या चित्रपटातील डायलॉग म्हणतो. थप्पड से डर नहीं लगता हैं प्यार से लगता हैं. हा संवाद केल्यावर सोनाक्षीचा राग अनावर होतो आणि ती त्याच्या श्रीमुखात लावते. 

हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमुळे सोनाक्षीला बरंच ट्रोलही केलं गेलं आहे. या शोमधून सोनाली सगळ्यांची शाळा घेताना दिसते आहे. सोनाक्षी सिन्हाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. सोनाक्षीची ही किलर स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. केस तो बनता है मधील सोनाक्षी सिन्हाचा एपिसोड तुम्ही Amazon Mini TV वर मोफत पाहू शकता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर सोनाक्षी डबल एक्सल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हासोबत हुमा कुरेशीही मुख्य भूमिकेत आहे.