मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता इरफान खानलापाठोपाठ आता अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर असल्याची माहिती समोर आली आली. दरम्यान एका रिएलिटी शोच्या परिक्षकाची भूमिका सोनाली बेंद्रे बजावत होती. मात्र अचानक तिची एक्झिट झाली. सोनाली नेमकी गेली कुठे हा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात होती. आता त्याचा उलगडा झाला आहे.
सोनाली बेंद्रेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कॅन्सरबाबत माहिती दिली आहे. सोनालीच्या पोस्टनुसार तिला हाय ग्रेड कॅन्सरचं निदान झालं आहे. काही टेस्टनंतर हे निदान स्पष्ट झाले आहे. सध्या उपचारांकरिता सोनाली बेंद्रे अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. सोनाली बेंंद्रे सामना करत असलेला High Grade Cancer म्हणजे नेमके काय ?
सोनाली बेंद्रे कॅन्सरशी सक्षमपणे लढा देत आहे. या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांसोबतच, सोनाली बेंद्रे सज्ज आहे. या काळात माझ्या परिवाराचा, मित्रांचा पाठिंबा आहे. इरफान खान झुंजत असलेला 'न्युरो एन्डोक्राईन ट्युमर' म्हणजे काय?